*केली कुणीतरी करणी*
*म्हणून लिहिली लेखणी,*
*डाँ.अभयसिंह यादव*
*कोल्हापूर प्रतिनिधी (युवा मराठा न्युज)*
*उठा उठा आमोस्या आली काळी* *करणी करायची वेळ झाली,*
हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरात करणी भर चौकात वर्दळीच्या ठिकाणीच पहायला मिळाली,
काल आमावस्या आणि वडगांवात झाली करणी,
हे काय वडगांव शहराला नवीन नाही
वडगांव शहरात पोर्णिमा असो वा आमावश्या कुठं ना कुठं तरी लिंबू उतारा काहीतरी आढळुन येणारचं
म्हैस दुध देतनाही , बैल चारा खात नाही , घरात काहीतरी घडले कि जावा देवरशी कडे जायचं तो सांगेल तो उतारा तिकाटन्यावर पडलाच म्हणून समजा.
अजूनही वडगांव शहरात अंधश्रद्धा जपली जाते ,
पोर्णिमेला तर हमखास मराठा नगर च्या कमानी जवळ , आणि डाँ.चौगलै नगर च्या कमानी जवळ लिंबू , नारळ , दोन माणसं जेवतील एवढा भात ,भाकरी हळद कुंकू हे ठरलेला उतारा पहायला मिळणारचं,
पण कालच्या आमवश्याला तर कहरच झाला करणी हळूहळू आता
तिकाटण्यावरणं मुख्य शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी म्हणजे
श्री विजयसिंह यादवसाहेब चौकात आली आहे ,
त्यात लिंबू नारळ गुलाल बाहुल्या आणि लै काही, त्यात पेपर पण हाय,
त्या पेपरात कुणाचे फोटो हाईत का
अस एकास विचारलं त्यो म्हणाला मी काय पुढं जाणार नाही बाबा..!!
काळ्या करणीन काही हो किंवा ना हो पण दहशत मात्र शहरात आहे हं…असो…!
काही काही जण आपल्याच फोटोची करणी कर्त्यात म्हणे म्हणजे आपली तेवढीच चर्चा ओ,
काही काही दुसऱ्याची- म्हणजे त्याला टेन्शन ओ, काही लोक नुसतं करून गम्मत बघत्यात,
काही लोक कोकणातुन सेरिअसली विषय आणत्यात म्हणे..!
असं करणीच वेगवेगळ प्रकार,
पण
करणी हि नेहमी राजकरणी
झाली पाहिजे गुन्हा नोंदणी
करणी पेक्षा
भरणी महत्वाची खड्ड्याची ओ…
*उठा उठा आमोस्या आली काळी करणी करायची वेळ झाली*