• Home
  • 🛑 *कोथरूडमधील परांजपे हायस्कूल जवळच्या रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मिटला* 🛑

🛑 *कोथरूडमधील परांजपे हायस्कूल जवळच्या रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मिटला* 🛑

🛑 *कोथरूडमधील परांजपे हायस्कूल जवळच्या रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मिटला* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

कोथरूड/ पुणे :⭕मधील भेलकेनगर चौक ते आशिष गार्डन रस्त्यावरील परांजपे हायस्कूल ते बधाई चौकापर्यंत जाणार्‍या रस्त्याचे काम अनेक वर्षापासून रखडले होते. कमिन्स इंडिया कंपनीच्या ताब्यातील काही जमीन पुणे महानगरपालिकेला देण्यासंदर्भात अनेक दिवसापासून सातत्याने प्रयत्न सुरू होते. आता कमिन्स इंडिया कंपनीच्या ताब्यातील जमीन आपल्या महापालिकेच्या ताब्यात आली असून रस्त्याचे काम सुरू होत आहे. या भागात प्रत्यक्ष जाऊन रस्त्याची पाहणी केली.

अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या रस्त्याचे काम आता होणार असून यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीच्या समस्येतून दिलासा मिळणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही.

पाहणी प्रसंगी नगरसेविका सौ. वासंतीताई जाधव, हर्षालीताई माथवड, पथ विभागाचे प्रमुख व्ही. बी. कुलकर्णी, भूसंपादन अधिकारी जे. पी. पवार, महापालिका सहआयुक्त संदीप कदम, तसेच कमिन्स इंडिया कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

कमिन्स कंपनी मागील गांधी भवनकडे जाणारा रस्ताही आता मोठा होणार असून तिथेही जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करत आहोत..⭕

anews Banner

Leave A Comment