• Home
  • 🚗🚗भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या वाहनाला अपघात🚗🚗

🚗🚗भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या वाहनाला अपघात🚗🚗

पुणे २७सप्टेंबर 🚗🚗 (युवा मराठा न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)🚗🚗

🚗🚗भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या वाहनाला अपघात🚗🚗
उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री गिरीश महाजन त्यांच्या वाहनाला काल रविवारी अपघात झाला.
या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
पाचोरा येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सुदैवाने गिरीश महाजन यांना कसलीही दुखापत झाली नाही.

पाचोरा तालुक्यातील लोहारा वरखेडे रस्त्यावर दुपारी ४ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेली माहिती अशी आहे की भाजपचे आमदार माजी मंत्री गिरीश महाजन हे मुंबईवरून काम आटोपून जामनेर येथे आपल्या घराकडे येत होते.

पाचोरा तालुक्यातील लोहारा वारखेडे रस्त्यावर दुचाकीस्वार पाठीमागून येऊन जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकी स्वराच्या
डोक्याला गंभीर जखम झाली आहे.
स्वतः गिरीश महाजन हे त्या दुचाकीस्वाराला मदतीसाठी धावले व त्या तरुणाला मदतीचा हात दिला

anews Banner

Leave A Comment