Home Breaking News गोदावरी, पुर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांना सर्तकेचा इशारा

गोदावरी, पुर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांना सर्तकेचा इशारा

126
0

गोदावरी, पुर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांना सर्तकेचा इशारा

नांदेड, दि. २१ ; राजेश एन भांगे
उर्ध्व पैनगंगा प्रकल्प उर्ध्व, उर्ध्व मानार प्रकल्प व निम्न मानार प्रकल्पही शंभर टक्के भरले असल्याने त्यांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस / अतिवृष्टी झाल्यास पाणी नदीत सोडण्यात येणार आहे. गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे, वेळोवेळी नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गाची माहिती जलसंपदा विभागाच्या नियंत्रण कक्षात दूरध्वनी क्र. 02462-263870 वर मिळू शकेल, असे आवाहन नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता स. को. सब्बीनवार यांनी केले आहे.

जायकवाडी प्रकल्पाचे पाणी विष्णुपुरी प्रकल्पात पोहचले असून 10 दरवाज्यातून 1 लाख 10 हजार 200 क्युसेकसने विसर्ग चालू आहे. नदीमधून येणारा येवा जास्त असला तरी विष्णुपुरी प्रकल्पाद्वारे तो नियं‍त्रीत करण्याचा प्रशानाचा प्रयत्न राहील व विसर्ग नियं‍त्रीत केला जाईल. जायकवाडी प्रकल्पातून पर्जन्यमानात घट झाल्यामुळे सोडण्यात येत असलेला विसर्ग कमी करुन 37 हजार 830 क्युसेकस विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. निम्न दुधना प्रकल्पातून 25 हजार 230 क्युसेकस विसर्ग पुर्णा नदीत सोडण्यात येत आहे. माजलगाव या मोठया प्रकल्पातून 31 हजार 420 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. पुर्णा प्रकल्पाच्या (येलदरी व सिध्देश्वर) पाणलोट क्षेत्रातून पुर्णा नदीत 36 हजार क्युसेक्स विसर्ग चालू आहे. या सर्व नद्यांचे पाणी गोदावरी नदीला मिळते. त्याचा एकूण विसर्ग 1 लाख 30 हजार 480 क्युसेकस आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास विसर्गात वाढ होऊ शकते.

सद्य:स्थितीत नांदेड शहरात पुर परिस्थिती नियंत्रणात आहे. सद्य:स्थितीत नांदेड शहराच्या खालील बाजूस तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरणसुध्दा 100 टक्के भरले असून तेथून 1 लाख 25 हजार क्युसेकस विसर्ग चालू आहे. पोचमपाड प्रकल्प शंभर टक्के भरला असल्याने गोदावरी नदीत फुगवटा निर्माण होतो. सध्या जुन्या पुलावर पाणीपातळी 348.82 मीटर आहे. इशारा पातळी 351 तर धोका पातळी 354 मीटर इतकी आहे. इशारा पातळीचा विसर्ग 2 लाख 13 हजार क्युसेकस व धोका पातळीचा विसर्ग 3 लाख 9 हजार 774 क्युसेकस आहे, अशी माहिती नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता स. को. सब्बीनवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Previous article*छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वतीने कोरोना वाँरियर्सना आँक्सिजन काँन्सट्रेटर चे २५ किट वाटप*
Next article🛑 अखिल भारतीय सेना….! नगरसेवका सौ. गीता गवळी ह्यांनी,आग्रीपाडा येथील बेबी मैदानाची पाहणी केली 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here