*कोरोनाने मृत झालेल्या पत्रकारांच्या* *कुटुंबाला 50* *लाखांचा विम्याची मागणी,*
*सातारा जिल्हा पत्रकार संघ*
*मोहन शिंदे( ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*
महाराष्ट्र सरकारने घोषणा केल्यानंतरही राज्यातील कोरोनाने बळी गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना पन्नास लाखांची मदत मिळाली ना पत्रकारांना विमा योजना सुरू केली गेली . त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असून तो व्यक्त करण्यासाठी सातारा जिल्हा पत्रकार संघाने जिल्हाभर जोरदार उठाव केला . विधान परिषदेचे सभापती ना रामराजे नाईक निंबाळकर , सातारा . याचे पालकमंत्री ना . बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदन देवून तातडीने पत्रकारांच्या विम्याची मागणी करण्यात आली . मराठी पत्रकार परिषदेने महाराष्ट्रात आंदोलनाची हाक दिली . त्याला सर्वांत मोठा प्रतिसाद सातारा जिल्ह्याने दिला सातारा जिल्ह्यातील 11 ही तालुक्यांमधील पत्रकार संघांनी त्या त्या तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन दिले . तर सातारा जिल्हा पत्रकार संघाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात विधान परिषदेचे सभापती ना रामराजे ना निंबाळकर , सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना . बाळासाहेब पाटील , सातारा याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह , जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते , आ . शशिकांत शिंदे यांना निवेदन दिले . आरोग्य मंत्री ना राजेश टोपे यांनी बुलढाणा येथील एका कार्यक्रमात बोलताना कोरोना योद्धे असलेल्या पत्रकाराचे कोरोनाने निधन झाले तर त्याच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत देण्याची घोषणा केली होती . मात्र , राज्यात आतापर्यंत 27 पत्रकारांचे बळी कोरोनानं घेतले असले तरी एकाही पत्रकाराच्या कुटुंबियांना पन्नास लाखांची काय एका दमडीची ही मदत सरकारकडून मिळाली नसल्याने पत्रकारांमध्ये मोठा संताप आहे . सातारा जिल्ह्यातही कराडचे मोहन कुलकर्णी यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे . राज्यातील पत्रकारांच्या कुटुंबांना सरकारने तातडीने मदत करावी , अशी मागणी यावेळी करण्यात आली . पत्रकारांना विमा कवच देण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी घोषणा केली होती . मात्र , बाबतही कोणताच निर्णय सरकारने घेतला नसल्याने राज्यातील पत्रकार अडचणीत आहेत कोविड सेंटरमध्ये योग्य सुविधा मिळत नाहीत आणि खासगी रूग्णालतील महागडे उपचार परवडत नाहीत अशा कात्रीत पत्रकार सापडले आहेत योग्य उपचार न मिळाल्याने पुण्यात पांडुरंग रायकर तर माथेरानमध्ये संतोष पवार या दोन पत्रकारांचे निधन झाले . त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणीही जिल्हा पत्रकार संघाने केली . शुक्रवार सकाळपासून सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे यांना ठरल्याप्रमाणे मेसेज करून मागणी केली . त्यानुसार सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी मेसेज करुन त्यांच्यावर भडीमार केला कोरोनाने मृत्यू झालेल्या दिवंगत पत्रकारांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली . यावेळी साताऱ्यातील आंदोलनावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे , कार्याध्यक्ष शरद काटकर सरचिटणीस दीपक प्रभावळकर , सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी , ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण , सुजित आंबेकर , राहुल तपासे , ओंकार कदम , तुषार तपासे , दीपक दीक्षित , संतोष नलावडे , प्रशांत जगताप , चंद्रसेन जाधव , मोहन मस्कर – पाटील , अरुण जावळे प्रतीक भद्रे , सनी शिंदे , किरण मोहिते , साई सावंत , ओंकार गिरी , अनुराग धिवार जावेद खान , आतीष चतुर , प्रकाश वायदंडे महेश क्षीरसागर , प्रकाश शिंदे , ओंकार सोनवले , तबरेज बागवान रिजवान सय्यद यांच्यासह प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते .
सभापतींनी राज्य शासनाला निर्देश द्यावेत … राज्यातील पत्रकार अडचणीत आहेत . 27 जणांचा बळी गेला आहे . घोषणेची अंमलबजावणी राज्य शासनाने केली पाहिजे . राज्याच्या सर्वोच्च सभागृहाचे सभापती म्हणून आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना व राज्य शासनाला तातडीने निर्देश द्यावेत अथवा तशी बैठक बोलवावी , अशी मागणी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी यावेळी विधान परिषदेचे सभापती ना . रामराजे ना निंबाळकर यांच्याकडे केली आपण तातडीने राज्य सरकारशी चर्चा करु असे यावेळी ना रामराजे यांनी सांगितले .
अकराही तालुक्यात आंदोलन सातारा जिल्हा पत्रकार संघाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये पत्रकार संघांनी आपापल्या भागातील पत्रकारांना बरोबर घेवून फिजीकल डिस्टन्स पाळत तहसीलदार व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन दिले ग्रामीण भागातील पत्रकारांची व्यथा या निवेदनात मांडण्यात आली . तर एसएमएसद्वारे ग्रामीण भागातील हजारो पत्रकारांनी आरोग्य मंत्र्यांनाही पत्रकार विमा योजनेबाबत मेसेज केले .