Home Breaking News *कोल्हापूर च्या महापौरांना मिळाली* *महापौरपदाची मुदतवाढ*

*कोल्हापूर च्या महापौरांना मिळाली* *महापौरपदाची मुदतवाढ*

1225

*कोल्हापूर च्या महापौरांना मिळाली* *महापौरपदाची मुदतवाढ*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज )*

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर निलोफर आजरेकर यांना देण्यात आलेली पदाची मुदत संपली. इच्छुकांनी महापौरांच्या राजीनाम्यासाठी मोठ्या प्रमाणात फिल्डिंग लावली होती. त्यासाठी यापूर्वी आठवड्यात दोन सभाही घेण्यात आल्या. परंतु, या ना त्या कारणाने महापौरांचा राजीनामा होता होता झाला नाही. अखेर आता महापौर आजरेकर यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला आहे. परिणामी, महापौर आजरेकर यांना मुदतवाढीची लॉटरी लागली आहे. अपक्ष असूनही आजरेकर यांना तब्बल 9 महिने महापौरपदाची संधी मिळणार आहे.
महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. सत्तेच्या फॉर्म्युल्यानुसार यंदाचे महापौरपद काँग्रेसकडे आहे.
आजरेकर या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. नंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. सर्वसाधारण प्रवर्ग महिलासाठी महापौरपद आरक्षित आहे. तसेच विद्यमान सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबरला संपत आहे. परिणामी महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. तरीही नेत्यांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी आजरेकरांना अपक्ष असुनही महापौरपदाची संधी दिली. 10 फेब—ुवारीला महापौरपदी आजरेकर यांची निवड झाली. त्यांना चार महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. 10 जूनला त्यांना देण्यात आलेली मुदत संपली.
जूनपासून इच्छुकांनी महापौर आजरेकर यांच्या राजीनाम्यासाठी आग्रह धरला होता. परिणामी महापालिकेतील पदाधिकार्यांचीही पंचाईत झाली होती. अखेर महापौरांच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतू कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी होईल असे कार्यक्रम सभा घेऊ नयेत, असे शासनाचे आदेश असल्याने महासभा घेता येत नव्हती. अखेर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या महिन्यातील महासभेत महापौरांचा राजीनामा द्यावा असे ठरले. परंतू राजीनामा झाला नाही. त्यानंतर पुन्हा स्थायी समितीतील चार सदस्यांच्या स्वाक्षरीने महापौरांच्या राजीनाम्यासाठी सभा आयोजित करण्यात आली. त्यातही महापौरांचा राजीनामा झाला नाही. परिणामी इच्छुकांचा जीव टांगणीला लागला होता. महापौरांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी तगादा लावला होता. परंतू कोरोनाने कोल्हापूर शहरात कहर केला असल्याने सद्यस्थितीत राजीनामा न घेण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला आहे.
महापौरपदासाठी इच्छुक जास्त असल्याने फेब्रुवारी नंतर दहा महिन्यांच्या कालावधीत पहिल्यांदा कोल्हापूर उत्तर मतदारसंघात व पुढील पाच महिने दक्षिण विधानसभा मतदारसंघात पद देण्याचा निर्णय झाला होता. पहिल्यांदा उत्तरमधील आजरेकरांना संधी मिळाली. आता दक्षिणमधून दीपा मगदूम यांना संधी मिळणार होती. परंतु, आजरेकर यांचा राजीनामा होणार नसल्याने मगदूम यांना पदापासून वंचित राहावे लागेल.
सत्तेच्या फॉर्म्युल्यानुसार महापालिकेच्या आर्थिक नाड्या हातात असलेले स्थायी समिती सभापती राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीतही इच्छुकांची संख्या जास्त आहे. तरीही तत्कालीन सभापती संदीप कवाळे यांचा राजीनामा घेऊन निवडणूक घेण्यात आली. राष्ट्रवादीने शब्द दिलेल्या सचिन पाटील यांना सभापती केले. कवाळे यांच्या राजीनाम्यानंतर सभापतिपदाची निवडणूक झाल्याने महापौर आजरेकर यांचाही राजीनामा घ्यावा यासाठी इच्छुकांनी जोरदार प्रयत्न केले होते. परंतु, अखेर महापौरांच्या राजीनामा प्रकरणावर पडदा पडल्याचे स्पष्ट झाले.

Previous article*नाशिकमध्ये छावा मराठा कृती समितीने राबविला कोरोना टेस्ट उपक्रम*
Next articleमानार नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.