Home Breaking News *मराठ्यांनो आंदोलनास सज्ज रहा ,* *सकल मराठा समाज* *कोल्हापूर*

*मराठ्यांनो आंदोलनास सज्ज रहा ,* *सकल मराठा समाज* *कोल्हापूर*

95
0

*मराठ्यांनो आंदोलनास सज्ज रहा ,* *सकल मराठा समाज* *कोल्हापूर*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील बारा तालुक्यात एकाचवेळी तीव्र आंदोलन करण्याची तयारी सुरू झाली असून, राजर्षी शाहूंच्या विचाराचे आरक्षण मिळविण्यासाठी मराठ्यांचा एल्गार पुकारण्यासाठी सर्वांशी आँनलाईन संपर्क सुरू झाला आहे. तालुक्यातील समन्वयकांच्या बैठकीत जिल्हास्तरीय एकच निर्णायक भूमिका घेऊन आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सकल मराठा समाजातर्फे ‌पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.
पत्रकात म्हटले आहे की, सुप्रीम कोर्टाचा मराठा आरक्षण स्थगिती निर्णय दुर्दैवी आहे. निर्णय देताना मराठ्यांसाठी वेगळा न्याय दिल्याचे स्पष्ट होते. हा सारासार अन्याय आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तब्बल ४ कोटीपेक्षा जास्त मराठ्यांमध्ये असंतोष खदखदत असून पुन्हा लढ्यास सज्ज राहावे लागणार आहे.
पण, जीवघेण्या कोरोनाचा कहर व संसर्ग लक्षात घेवून संसर्ग होऊ नये यास्तव रस्त्यावरील लढ्याची दिशा बदलावी लागणार आहे. यासाठी कोल्हापूर शहर, इचलकरंजी, जयसिंगपूर, शिरोळ, कागल, मुरगूड, कुरूंदवाड, हातकणंगले, गडहिंंग्लज, आजरा, वडगांव, राशिवडे, राधानगरी, बांबवडे, कोडोली शहरातील सकल मराठा समन्वयकाच्या बैठकीत जिल्हास्तरीय एकच निर्णायक भूमिका घेऊन पुन्हा लढ्याची तयारी सुरू केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील आंदोलन संपूर्ण महाराष्ट्राला दिशादर्शक व शासनाला धडकी भरवणारे करण्यासाठी मराठ्यांनो सज्ज रहा, असे आवाहन केले असून, योग्य वेळी तीव्र आंदोलन करण्यात येईल.
पत्रकावर वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत,
दिलीप देसाई, अॅड. गुलाबराव घोरपडे, हर्षल सुर्वे, शाहीर दिलीप सावंत, संदीप देसाई, संजय जाधव, धनंजय सावंत, दिगंबर फराकटे, कमलाकर जगदाळे, सुशिल भांदिगरे, विकास जाधव, श्रीधर गाडगीळ, उदय भोसले, युवराज जाधव, मयूर पाटील, शशिकांत पाटील, चंद्रकांत बराले, उत्तम जाधव, चंद्रमोहन पाटील, संजय काटकर, संजय जाधव, प्रताप नाईक, प्रशांत बरगे, अवधूत पाटील यांची नावे आहेत.

Previous article*निधनवार्ता*
Next article*मराठा आरक्षण बाबत शरद पवारांनी* *मध्यस्थी करावी ,* *छत्रपती संभाजीराजे.*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here