• Home
  • *पेठ वडगांव शहराचे माजी.उपनगराध्यक्ष यांना पितृ शोक*

*पेठ वडगांव शहराचे माजी.उपनगराध्यक्ष यांना पितृ शोक*

*पेठ वडगांव शहराचे माजी.उपनगराध्यक्ष यांना पितृ शोक*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरातील माजी.उपनगराध्यक्ष डाँ.अशोक चौगुले (एम.डी.) भाजपाचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष यांचे वडिल लिंगायत समाजाचे आधारवड मा. डॉ. आण्णासाहेब चौगुले.(एम.बी.बी.एस) हातकणंगले तालुका सहकारी सुतगिरणीचे संस्थापक व वैद्यकीय , सहकार ,राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील एक तेजस्वी व्यक्तिमत्व काळाच्या पडदयाआड गेले.
विचारांशी निष्ठा, विकासाचे धोरण, निःस्वार्थी वृत्ती,नियोजनबद्ध कार्यपद्धती ही डॉक्टर साहेबांची खास वैशिष्टे होती .
पेठ वडगांव पंचक्रोशी बरोबरच कोल्हापूर जिल्हा मध्ये एक नामवंत हाडाचे डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती, रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेने त्यांनी या व्यवसायाकडे पाहिलं. विना सहकार नाही उध्दार या उद्दात हेतूने वडगांव पंचक्रोशीत गरिबांचा आधारवड ठरलेली आणि सामान्यांच्या जीवनात आर्थिक वसंत फुलवणारी वडगाव अर्बन बँक स्थापन केली आणि आज त्याचा वाढ विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो, त्याचबरोबर गोरगरिबांच्या हाताला काम आणि जगायला दाम याकरिता हातकणंगले सहकारी सूतगिरणीची स्थापना केली.
वडगांव नगरीचे भाग्यविधाते रौप्यमोहत्सवी नगराध्यक्ष कै.विजयसिंह यादव साहेब यांच्या बरोबर राजकारणात सक्रीय असणारे जवळचे सहकारी
जेष्ठ नामवंत अभ्यासु , हुषार व्यक्तीमत्व डाँ. आण्णासाहेब चौगले आज अनंतात विलीन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी , मुले , नातवंडे असा मोठा परिवार आहे.

anews Banner

Leave A Comment