• Home
  • 🛑 खुशखबर! पीएफ धारकांच्या व्याजदरात होणार वाढ 🛑

🛑 खुशखबर! पीएफ धारकांच्या व्याजदरात होणार वाढ 🛑

🛑 खुशखबर! पीएफ धारकांच्या व्याजदरात होणार वाढ 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

अंबाला, 11 सप्टेंबर : ⭕ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने बुधवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) बुधवारी आपल्या सहा कोटी ग्राहकांच्या पीएफमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ८.५० टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. मात्र, हे व्याज दोन टप्प्यात दिलं जाणार आहे. याआधी ८.१५ टक्के एवढं व्याज मिळकत होतं.

ईपीएफओने भविष्य निर्वाह निधीवर निश्चित व्याज दोन टप्प्यात देण्याचं ठरवलं आहे. पहिल्या टप्प्यात ८.१५ टक्के व्याज दिलं जाणार होतं. उर्वरित ०.३५ टक्के व्याज डिसेंबरमध्ये देण्यात येणार आहे. ईपीएफओच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय बोर्डाने त्यांच्या ठेवींशी निगडित विमा योजनेअंतर्गत पेआऊटची उच्च मर्यादा ६ लाख रुपयांवरून ७ लाख रुपये केली आहे. तथापि, आपल्या ग्राहकांसाठी स्वतंत्र पेन्शन योजना चालविण्याच्या ईपीएफओच्या प्रस्तावाला कर्मचार्‍यांच्या प्रतिनिधींनी विरोध दर्शविला. या प्रस्तावावर डिसेंबरच्या पुढील बैठकीत पुन्हा विचार केला जाईल.

ईपीएफओने यापूर्वी बाजारातील एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) मध्ये गुंतवलेला निधी विकण्याची योजना केली होती. ईपीएफ भागधारकांना ८.५ टक्के दराने व्याजाचे संपूर्ण पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, कोविड-१९ मुळे बाजारात मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाल्यामुळे तसं करता आलं नाही. ईपीएफओचा सेंट्रल ट्रस्टी बोर्ड (सीबीटी) संघटनेची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. डिसेंबर २०२० मध्ये पुन्हा याची बैठक होईल. यामध्ये भविष्य निर्वाह निधीच्या भागधारकांच्या खात्यात ०.३५ टक्के दराने व्याजाच्या थकित रकमेच्या पेमेंटचा विचार केला जाईल.⭕

anews Banner

Leave A Comment