• Home
  • 🛑 अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर 🛑

🛑 अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर 🛑

🛑 अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

अंबाला, 11 सप्टेंबर : ⭕ कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा राज्यातील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. मात्र आता सर्वोच्च न्यायालय SEBC आरक्षण संदर्भातील आदेशाचे अनुषंगाने इयत्ता ११वी प्रवेश प्रक्रियेची सदर कार्यवाही पुढे ढकलण्यात येत आहे. ११वी प्रवेश प्रक्रिये बाबत पुढील कार्यवाहीचे वेळापत्रक शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल अशी माहिती शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य यांनी अकरावी प्रवेशाच्या 11thadmission.org.in या अधिकत वेबसाईटवरून दिली आहे.

मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर महानगरपालिका हद्दीत ११वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. या प्रवेश प्रकियेनुसार विद्यार्थ्यांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यानंतर पहिली गुणवत्ता यादी (३० ऑगस्ट २०२०) सायंकाळी जाहीर करण्यात आली. तर दुसरी गुणवत्ता यादी आज (१० सप्टेंबर २०२०) रोजी जाहीर होणार होती. मात्र, ९ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता ही यादी जाहीर करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.⭕

anews Banner

Leave A Comment