• Home
  • 🛑 2021 मध्ये या दोन रूटवर धावणार मेट्रो 🛑

🛑 2021 मध्ये या दोन रूटवर धावणार मेट्रो 🛑

🛑 2021 मध्ये या दोन रूटवर धावणार मेट्रो 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 11 सप्टेंबर : ⭕ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे सुरु असलेली मेट्रो-2 अ (दहिसर ते डीएन नगर ) आणि मेट्रो-7 ( (दहिसर पूर्व ते डीएन नगर पूर्व ) मार्गावरील मेट्रो रेल्वेच्या ट्रायल जानेवारी महिन्यात सुरु होणार आहेत. विशेषत: या दोन्ही मार्गासाठी लागणारे मेट्रो रेल्वे कोच येत्या काही दिवसांत चारकोप डेपोत दाखल होणार असून, जानेवारी महिन्यातील मेट्रो रेल्वेच्या ट्रायलनंतर प्रत्यक्षात मे महिन्यात या दोन्ही मार्गांवरील मेट्रो धावणार आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी कोरोना काळात आलेल्या अडचणीसह मेट्रो-2 अ आणि मेट्रो-7 च्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी मेट्रो-2 अ आणि मेट्रो-7 डिसेंबरपर्यंत सुरु करण्याचा विचार होता. मात्र कोरोनासारख्या असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. आता या मेट्रो-2 अ आणि मेट्रो-7 चे काम वेगाने सुरु आहे. 11 डिसेंबर रोजी मेट्रो कोचचे 3 सेट मुंबईत दाखल होणार आहेत. चारकोपमध्ये हे मेट्रो कोच दाखल होतील.

एप्रिलमध्ये 10 ट्रेन येतील. ट्रायल सुरु करण्यासाठी काही वेळ लागतो. किमान एक महिना यासाठीच वेळ विचारात घेतला आहे. 14 जानेवारीच्या आसपास आपण मेट्रोच्या ट्रायल सुरु करू. मे महिन्यात या दोन्ही मेट्रो सुरु होतील, असा विश्वास आहे. दहा मेट्रो सुरु करतानाच दोन मेट्रोमध्ये अर्धा तासाचे अंतर असेल. कालांतराने मेट्रोची संख्या वाढवितानाच दोन मेट्रोमधील वेळेचे अंतर कमी करण्यासाठी विचार केला जाईल. सर्व योजना पुर्ण झाल्या आहेत. कोरोनामुळे काही अडचणी आल्या. कामगार कमी झाले. मात्र आम्ही अडचणींवर मात केली आहे असे आयुक्तांनी सांगितले.⭕

anews Banner

Leave A Comment