• Home
  • 🛑 शाळेत प्रवेशापूर्वी द्यावे लागणार लेखी पत्र….! या राज्यात २१ सप्टेंबरपासून- विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश 🛑

🛑 शाळेत प्रवेशापूर्वी द्यावे लागणार लेखी पत्र….! या राज्यात २१ सप्टेंबरपासून- विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश 🛑

🛑 शाळेत प्रवेशापूर्वी द्यावे लागणार लेखी पत्र….! या राज्यात २१ सप्टेंबरपासून- विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश 🛑
✍️ नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली :⭕दिल्लीच्या शिक्षण निर्देशालयाने शुक्रवारी सांगितले की दिल्लीत सर्व शाळा कोविड-19 महासाथीमुळे 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहतील, मात्र मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी 21 सप्टेंबरमध्ये शाळेत येण्याची परवानगी असेल.

दिल्लीतील शाळेत 50 टक्के शिक्षकांना बोलावण्यात येऊ शकते

शिक्षण निर्देशालयाने (डीओई) सांगितले की, कोविड-19 निषिद्ध क्षेत्रांच्या बाहेर 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाला ऑनलाइन वर्ग, टेली-काऊंन्सिलिंग वा संबंधित कामांसाठी शाळेत बोलवण्यात येऊ शकते.

⭕दिल्लीत सर्व शाळा 30 सप्टेंबरपर्यंत राहतील बंद⭕

डीओईने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या महासाथीत सर्व शाळा 30 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बंद राहतील मात्र 9 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना (क्वारंटाइन भागाव्यतिरिक्त) त्यांच्या शाळांमध्ये शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यास जाण्याची परवानगी आहे.

मात्र शाळेत प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना पालकांनी लेखी परवानगी आवश्यक असेल.
मार्च महिन्यापासून देशात कोरोनाचा कहर सुरू झाला आहे.

अशात कोरोनाचा हा प्रकोप 2021पर्यंत आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे निर्देशक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे. रोज कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही रुग्ण वाढ आणखी काही महिने सुरू राहणार असल्याचं गुलेरिया म्हणाले आहेत.

अद्याप कोरोनावर कोणतीही ठोस लस आली नाही. अशात देश अनलॉकच्या प्रक्रियेत आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षापर्यंत कोरोना आणखी वाढेन असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

मोठ्या संख्येने रुग्णवाढ होईन असं मी म्हणत नाही पण रुग्णांची वाढणार अशी चिन्ह आहेत. असं असलं तरी यावर्षीच कोरोनाचा प्रभाव संपण्याचा सर्व यंत्रणेचा प्रयत्न आहे….⭕

anews Banner

Leave A Comment