• Home
  • 🛑 ” हिस्सार ” मध्ये सुरू होणार गाढविणीच्या दुधाची…! देशातील पहिली डेयरी -: १ लीटर दुधाची किंमत ७०००/- रुपये 🛑 ✍️ नवी दिल्ली :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 ” हिस्सार ” मध्ये सुरू होणार गाढविणीच्या दुधाची…! देशातील पहिली डेयरी -: १ लीटर दुधाची किंमत ७०००/- रुपये 🛑 ✍️ नवी दिल्ली :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 ” हिस्सार ” मध्ये सुरू होणार गाढविणीच्या दुधाची…! देशातील पहिली डेयरी -: १ लीटर दुधाची किंमत ७०००/- रुपये 🛑
✍️ नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली :⭕- गाढवाच्या नावाचा उपयोग एखाद्याला चिडवण्यासाठी किंवा कमीपणा दाखवण्यासाठी केला जातो. पण गाढव किती उपयोगी प्राणी आहे हे देखील सर्वांना माहीतच आहे.

आत्तापर्यंत तुम्ही फक्त गाय किंवा म्हशीच्या दुधाची डेयरी पाहिली असेल, पण आता लवकरच हरियाणातील हिस्सारमध्ये गाढविणीच्या दुधाची डेयरी सुरू होणार आहे.

देशात पहिल्यांदाच गाढविणीचे दूध विकले जाणार आहे. 1 लीटर दुधाची किंमत तब्बल 7000 रुपये इतकी असेल. गाढविणीचे दूध खूप उपयोगी असते, ते माणसाच्या शरीरातील इम्युनिटी वाढवण्याचे काम करते. या दुधापासून अनेक ब्युटी प्रॉडक्ट देखील बनवले जातात.

नॅशनल हॉर्स रिसर्च सेंटर (हिस्सार) येथे आता गाढविणीच्या दुधाची डेयरी सुरू करण्यात येणार आहे.

हलारी नस्ल गाढविणीचे दूध इथं मिळणार आहे. त्यासाठी 10 गाढविणी याठिकाणी आणण्यात आल्या आहेत.

हलारी नस्ल गाढविणीच्या दुधाला औषधांचा खजाना समजलं जातं. या दुधात कॅन्सर, लठ्ठपणा यासारख्या आजारांशी लढण्याची क्षमता असते. या जातीच्या गाढविणी गुजरात मध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात.

तज्ञांच्या मते, अनेकदा गाय किंवा म्हशीच्या दुधामुळे लहान मुलांना ऍलर्जी होऊ शकते, पण गाढविणीच्या दुधामुळे ऍलर्जी होत नाही. या दुधात अँटी ऑक्सिडेंट, अँटी एजिन तत्व असतात जे गंभीर आजारांशी लढण्यासाठी उपयुक्त ठरतात.

या डेयरीचे काम लवकरच सुरू होईल. गाढविणीचे दूध 2000 ते 7000 रुपये प्रती लीटर विकते. या दुधापासून अनेक ब्युटी प्रॉडक्ट देखील बनवले जातात जे खूप महाग विकतात. तसंच साबण, बॉडी लोशन, लिप बाम असे प्रॉडक्ट देखील या दुधापासून बनवले जातात.

यासाठी NRCE मधील वैज्ञानिकांची देखील मदत घेतली जाणार आहे. डेयरी सुरू झाल्यानंतर लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे….⭕

anews Banner

Leave A Comment