• Home
  • *राज्यात पाच महिन्यांनतर आंतरजिल्हा एस.टी.बससेवा चालू*

*राज्यात पाच महिन्यांनतर आंतरजिल्हा एस.टी.बससेवा चालू*

*राज्यात पाच महिन्यांनतर आंतरजिल्हा एस.टी.बससेवा चालू*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा )*

देशभरात कोरोनाच्या महामारी संकटामुळे महाराष्ट्रातही कोरोना ने थैमान घालून होत्याच नव्हते करून ठेवले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एस.टी.बस सेवा कोरोनाचा संसर्ग वाढूनये यासाठी बससेवा बंद करण्यात आली होती.
मात्र , याचा एस.टी.सह प्रवाशानांही फटका बसला होता.
आज तब्बल पाच महिन्यानंतर एसटी.बससेवेला राज्य सरकारने आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी दिल्याने पुन्हा रस्त्यावर महाराष्ट्राची लोकवाहीनी लालपरी आज दिसू लागली .
प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेची काळजी घेतली जातेय.
प्रवाशाना बसमध्ये मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आलंय.
अनेकांना या बससेवेमुळे आपआपल्या गावी जाऊन नातेवाईकांना भेटता येणार आहे.
नोकरीमुळे अडकून पडलेल्यांनाही गावी जाता येणार आहे.
आता एस.टी.चालु झाली असली तरी बस स्थानकात प्रवासी संख्या कमी दिसून येत आहे.
अपुऱ्या प्रवासी संख्येमुळे काही ठिकाणी बसेस रद्द कराव्या लागल्या आहे.
एस.टी.बस चालु झाल्याने एस.टी. कर्मचाऱ्यांतुन समाधान व्यक्त होत आहे.
लालपरी चालु झाल्याने अनेकांना त्याचा फायदा होणार आहे.

anews Banner

Leave A Comment