• Home
  • नाशिकच्या मालेगांव तालुक्यातील व-हाणे या गांवी आज सकाळी हदय हेलावून टाकणारी एक दुर्दैवी घटना

नाशिकच्या मालेगांव तालुक्यातील व-हाणे या गांवी आज सकाळी हदय हेलावून टाकणारी एक दुर्दैवी घटना

*व-हाणेत पोहण्यास गेलेल्या तरुण मुलाचा बुडून मृत्यू* *(युवा मराठा न्युज नेटवर्क)- पोळा सणादिवशीच गावावर शोककळा*
मालेगांव नाशिकच्या मालेगांव तालुक्यातील व-हाणे या गांवी आज सकाळी हदय हेलावून टाकणारी एक दुर्दैवी घटना घडली.त्यामुळे पोळा सणाच्या दिवशीच संपूर्ण व-हाणे गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,व-हाणे गावातील एक सतरा वर्षिय युवक ज्ञानेश्वर बापू पवार हा आज सकाळी गावाशेजारील नदीत पोहण्यास गेला असता,खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ज्ञानेश्वर बापू पवार हा पाण्यात बुडून जागीच मृत्यू पावला.ऐन तारुण्यात व बारावीत शिकत असलेला हा युवक अचानक आज पोळा सणाच्या दिवशीच मृत्यूमुखी पडल्याने संपूर्ण व-हाणे गावावर शोककळा पसरली आहे.मालेगांवच्या सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर या युवकावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

anews Banner

Leave A Comment