Home Breaking News 🛑 अखेर MPSC परीक्षा पुन्हा पुढे ढकलली 🛑

🛑 अखेर MPSC परीक्षा पुन्हा पुढे ढकलली 🛑

88
0

🛑 अखेर MPSC परीक्षा पुन्हा पुढे ढकलली 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 13 ऑगस्ट : ⭕ यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पूर्वपरीक्षेचा मुहूर्त काही स्थिर होण्याचं नाव घेत नाहीये. नियमित वेळापत्रकानुसार दरवर्षी या परीक्षा एप्रिल महिन्यात होता. मात्र या वर्षी कोरोनाचं संकट समोर असताना या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. एप्रिल महिन्यात ४ तारखेला ही परीक्षा (Competitive Exam) होणार होती. मात्र, कोरोनामुळे ती पुढे ढकलून २६ एप्रिल करण्यात आली. पण कोरोनाचं संकट वाढल्यामुळे २६ एप्रिलची परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली होती. अनिश्चित काळासाठी या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर अखेर १७ जून रोजी राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार १३ सप्टेंबर रोजी राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर रोजी तर अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर रोजी होणार असं जाहीर करण्यात आलं होतं. पण आता पुन्हा एकदा त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा आता २० सप्टेंबर रोजी होणार आहेत. पण त्यासाठी कोरोना हे कारण ठरलं नसून नीटच्या (NEET) परीक्षा कारणीभूत ठरल्या आहेत (Timetable).⭕

Previous articleनांदेड जिल्ह्याचे खा. चिखलीकर यांची केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या समितीवर निवड
Next article🛑 तिरंग्याच्या मास्कचा निषेध 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here