• Home
  • 🛑 लोकल ट्रेन, मेल, एक्सप्रेस वाहतूक 30 सप्टेंबर पर्यंत बंद राहणार 🛑

🛑 लोकल ट्रेन, मेल, एक्सप्रेस वाहतूक 30 सप्टेंबर पर्यंत बंद राहणार 🛑

🛑 लोकल ट्रेन, मेल, एक्सप्रेस वाहतूक 30 सप्टेंबर पर्यंत बंद राहणार 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 11 ऑगस्ट : ⭕ करोना संकटामुळे घोषित झालेल्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट मिळाली आहे. यामुळे मुंबईतील लोकल ट्रेन, मेल, एक्सप्रेस वाहतूक 30 सप्टेंबर पर्यंत बंद राहणार. मुंबई अत्यावश्यक सेवेतील आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच या लोकल धावणार आहे.

मुंबईत वाढवलेल्या लोकलच्या फेऱ्या या सर्वसामन्यांसाठी नाहीत. तर फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहेत. या लोकलमधून महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार, आयटी, जीएसटी, सीमा शुल्क, टपाल विभाग, राष्ट्रीय बँका, एमबीपीटी, कोर्ट, सुरक्षा आणि राजभवनाच्या कर्माचाऱ्यांनाच प्रवास करता येणार आहे, असं जारी केलेल्या पत्रकातून रेल्वे स्पष्ट केलं आहे. सध्या सुरू असलेल्या सर्व लोकल या विशेष लोकल आहेत आणि त्या फक्त अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहेत, असं रेल्वेने म्हटलं आहे.

ओळखपत्र दाखवल्यावर कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवासाकरता प्रवेश दिला जाणार आहे. तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे.⭕

anews Banner

Leave A Comment