पालघर मध्ये दूध एल्गार आंदोलन रास्ता रोको.
पालघर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक चाररस्ता पालघर येथे भाजपा,रिपाई (आ) महायुतीचे ईतर घटक पक्ष वतीने राज्यव्यापी दूध एल्गार महाराष्ट्र शासनाच्या विरोधात चाररस्ता पालघर येथे जोरदार रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे, मा.जिल्हाधिकारी पालघर द्वारा मा.ना.उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना निवेदन देण्यात आले त्या समयी भाजपाचे समीर पाटील जिल्हा युवा अध्यक्ष,रिपाई (आ)चे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव,भाजपा उपाध्यक्ष प्रशांत पाटील,भाजपा पालघर शहर अध्यक्ष अरुण माने, रिपाई (आ) तालुका अध्यक्ष शरद जाधव, राम ठाकूर पालघर शहर उपाध्यक्ष, नगरसेवक भावानंद संखे,तेजसिह हजारी भाजपा सरचिटणीस पालघर जिल्हा, नगरसेविका अनिता किणी,अॅड. गीता संखे नगरसेविका, रिपाई (आ) चे दिपेश गायकवाड, रवि सोळंकी,संकेत वरठा,राजू शेख, जागृत जाधव उपाध्यक्ष पा. ता., शाहरुख शेख ईत्यादी मान्यवर उपस्थित होते .*