Home Breaking News नायगांव (बा.) भाजपाच्या वातिने दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर १० रुपये...

नायगांव (बा.) भाजपाच्या वातिने दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर १० रुपये वाढीव भाव व दूध भुकटीला ५० रुपये अनुदान मिळावे यासाठी रास्तारोको आंदोलन

253

नांदेड,दि.१ ; राजेश एन भांगे

नायगांव (बा.) भाजपाच्या वातिने दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर १० रुपये वाढीव भाव व दूध भुकटीला ५० रुपये अनुदान मिळावे यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.  महायुतीच्या वतीने २१ जुलै २०२० ला राज्यभर शासनाला दुध भेट देऊन मागण्या मान्य नाही झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु आता पर्यंत दुध प्रश्नावर काहीच निर्णय न झाल्याने १ ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश भाजपा व महायुतीच्या वतीने करण्यात आले.

त्याच अनुशंघाने आज दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला १० रूपये दर वाढ व दुध बुकटिला ५०- रूपये अनुदान मिळावे व शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे तसेच लाॕकडावुन काळातील विजबिल माफ करावे म्हणून नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलिकर यांच्या नेत्रत्वाखाली आज रोजी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी रास्तारोको आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

तर नायगांव विधानसभेचे आमदार (भाजपा उमेदवार) श्री.राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली नायगांव बा. येथे सुद्धा आघाडी सरकारच्या विरोधात निषेध करून एल्गार आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपा नेते दिलीपराव धर्माधिकारी, तालुकाध्यक्ष कोंडीबा पा. शिंदे, शहराध्यक्ष शंकर पा. कल्याण, भगवान पा. लंगडापूरे, प्रा.जीवन पा. चव्हाण, सुनील शिंदे, शिवाजी जाधव, राहुल नकाते, बाबासाहेब हंबर्डे, रणजीत कुरे, देविदास बोमनाळे, शरद पाटील, गजानन अशोकराव चव्हाण, साईनाथ हेंडगे, नागेश कहाळेकर, बालाजी बामणपल्ले, प्रकाश केरुरे, शिवाजी ढगे, धनंजय पा. राम पा., परमेश्वर पा. व अनेक शेतकरी बांधव हि यावेळी उपस्थित होते.

Previous articleमालेगांव कॅम्प येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शताब्दी जयंती उत्सवात साजरी
Next article🛑 राजेश टोपे यांना मातृशोक 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.