• Home
  • मालेगांव कॅम्प येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शताब्दी जयंती उत्सवात साजरी

मालेगांव कॅम्प येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शताब्दी जयंती उत्सवात साजरी

 

मालेगांव कॅम्प येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शताब्दी जयंती उत्सवात साजरी करण्यात आली …

मालेगांव कॅम्प – (गणेशवाडी) अण्णाभाऊ साठे नगर, येथील जुनी फरशीरोड, गल्ली भागात विश्वभूषण लोकशाहीर अण्णाभाऊसाठे फौंडेशन तर्फे जागतिक साहित्यिक सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०० वी जन्म शताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी नगरसेवक श्री.भीमा (भाऊ) भडांगे आणि श्री दिनेश साबणे (सामजिक कार्यकर्ते) व मालेगांव महानगरपालिके च्या वतीने शहर स्वच्छता निरीक्षक संदीप कापडे यांच्या हास्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून त्यांना अभिवांदन करण्यात आले.
या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष स्थानी विश्वभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फौउंडेशनचे उत्तर महारष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री.पुंडलिक कांबळे हे उपस्थित होते. तसेच मालेगांव तालुका अध्यक्ष सुभाष भालेराव, तालुका कार्याध्यक्ष विजय वाकळे हे ह्या प्रसंगी उपस्थित होते जेष्ठ नागरिक व सामजिक कार्यकर्ते अर्जुन (दादा) पोळ, विष्णू (दादा) कांबळे उपस्थित होते
या कार्यक्रमा प्रसंगी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर साठे फौउंडेशन मालेगांव महानगर जिल्हा अध्यक्ष श्री.मोहन कांबळे व लोकेश चव्हाण अविनाश परमार कार्यकर्ते राजेंद्र वाकळे पवन थांटशिगर, पिंटू (दादा) अहिरे , संतोष मांडवडे, सुनील काबंळे, सुनंदा केदारे हिराबाई कांबळे,कल्याणी बकुरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थिती होते या वेळी वार्डातील लहान मुलांना चोकलेट वाटण्यात आले

anews Banner

Leave A Comment