• Home
  • 🛑 Income Tax भरण्याची मुदत वाढवली; ही आहे नवी Deadline 🛑

🛑 Income Tax भरण्याची मुदत वाढवली; ही आहे नवी Deadline 🛑

🛑 Income Tax भरण्याची मुदत वाढवली; ही आहे नवी Deadline 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 31 जुलै : ⭕ आयकर विभागाने कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे आयकर भरणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत २ महिन्यांपर्यंत वाढविली आहे. विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सन २०१८- २०१९ या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. आयकर विभागाने म्हटले आहे की, कोरोनामुळे सुरू असलेल्या अडचणींमुळे, करदात्यांना दिलासा मिळावा म्हणून ३१ जुलै २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या आर्थिक वर्षासाठी (AY2019-20) आर्थिक वर्षातील आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख असणार आहे.

जून महिन्यात सीबीडीटीने आयटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख एक महिन्याने वाढवून ३१ जुलै केली होती. यासह, आर्थिक वर्ष २०१९ -२० (AY2020-21) च्या परताव्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. गेल्या महिन्यात सरकारने १ लाखांपर्यंत असणीऱ्या सेल्फ एसेसमेंट टॅक्स भरण्यासाठी मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे.

दरम्यान, देशातील बर्‍याच ठिकाणी लॉकडाऊन सुरूच आहे, तर कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अनेक राज्यात नवीन नियम लागू करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रिटर्न्स भरण्यात करदात्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत, त्या दृष्टीने आयकर विभागाने रिटर्न भरण्यासाठी अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरुन करदात्यांना रिटर्न भरण्यासाठी अधिक आवश्यक वेळ मिळू शकेल.⭕

anews Banner

Leave A Comment