Home Breaking News मराठा क्रांती मोर्चाने दिले आत्मबलिदानआंदोलनाची हाक

मराठा क्रांती मोर्चाने दिले आत्मबलिदानआंदोलनाची हाक

190

मराठा क्रांती मोर्चाने दिले आत्मबलिदानआंदोलनाची हाक
प्रतिनिधी= किरण अहिरराव

औरंगाबाद । मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात मोर्चे काढण्यात आले होते. सुरूवातीच्या काही मोर्चानंतर मराठा समाजातील काही तरुणांनी तत्कालीन सरकारचं मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बलिदान दिलं होतं. या तरुणांच्या कुटुंबीयांना सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चानं आता आत्मबलिदान आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. २३ जुलै रोजी कायगाव टोका येथे आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी ही माहिती दिली.

मराठी क्रांती मोर्चाच्या काळात काकासाहेब शिंदे या तरुणानं औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका येथे जलसमाधी घेतली होती.
याच ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या ४२ जणांच्या कुटुंबातील व्यक्ती या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा मोर्चाच्या वतीनं देण्यात आला आहे. काकासाहेब शिंदे या तरुणानं नदीत जलसमाधी घेतली होती. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचं आक्रमक रुप बघायला मिळालं होतं. त्याच्या स्मृतिदिनीच हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला औरंगाबाद पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. त्याचबरोबर आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मात्र, क्रांती मोर्चा आंदोलनावर ठाम आहे.

Previous article*कोव्हिड काळजी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करा.*
Next articleकोरोना संशयीत मृत स्त्रीच्या पार्थिवावर मुस्लिम बांधवानी केले अंत्यसंस्कार.*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.