नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 11.12 मि.मी. पाऊसाची नोंद –
नांदेड, दि. २१ ; राजेश एन भांगे
जिल्ह्यात मंगळवार 21 जुलै 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 11.12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 177.89 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 343.44 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 38.53 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 21 जुलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस :
नांदेड- 7.50 (411.83),
मुदखेड- निरंक (255.00),
अर्धापूर- निरंक (347.33),
भोकर- 4.75 (358.98),
उमरी- निरंक (238.63),
कंधार- 15.00 (267.50),
लोहा- 13.50 (339.49),
किनवट- 21.71 (360.81),
माहूर- निरंक (316.75),
हदगाव- 1.57 (326.29),
हिमायतनगर- 9.67 (528.99),
देगलूर- 41.17 (345.94),
बिलोली- 14.80 (324.40),
धर्माबाद- 6.33 (362.32),
नायगाव- 10.60 (320.80),
मुखेड- 31.29 (389.98).
आज अखेर पावसाची सरासरी
343.44 (चालू वर्षाचा एकूण
पाऊस 5495.04) मिलीमीटर आहे.