Home Breaking News पुणे १९ जुलै– ( युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी) ⭕पुणे –टेरेसवरती...

पुणे १९ जुलै– ( युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी) ⭕पुणे –टेरेसवरती पतंग उडवु न दिल्याने महिलेचा विनयभंग⭕

108
0

पुणे १९ जुलै– ( युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी) ⭕पुणे –टेरेसवरती पतंग उडवु न दिल्याने महिलेचा विनयभंग⭕ पुणे सोसायटीतील मुलांना पतंग उडवून दिल्यामुळे त्या मुलांनी एका कुटुंबाला मारहाण करीत महिलेचा विनयभंग केला. ही घटना कासेवाडी येथे घडली. याप्रकरणी दोघांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. सागर सोमनाथ चव्हाण वय (२५) राजेश बबन पवार व ईश्वर संतोष गायकवाड (सर्व राहणार भीमाले संकुल भवानी पेठ) अशी आरोपींची नावे आहेत यातील राजेश व ईश्वर ला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका (३०)वर्षीय महिलेने तक्रार केली आहे. यातील फिर्यादी चे पती आणि १२ मजल्यावरील महिलेने आरोपींना टेरेस वर पतंग उडवू देण्यास नकार दिला होता. याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीचे पती व सासूला मारहाण केली व फिर्यादीचा गाऊन फाडून तिचा विनयभंग केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पांढरे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here