• Home
  • 🛑 मुंबई-ठाणे विभाग एसटी महामंडळाला कोरोनाचा विळखा…..! कर्मचाऱ्यांना झाली बाधा 🛑 ✍️मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 मुंबई-ठाणे विभाग एसटी महामंडळाला कोरोनाचा विळखा…..! कर्मचाऱ्यांना झाली बाधा 🛑 ✍️मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 मुंबई-ठाणे विभाग एसटी महामंडळाला कोरोनाचा विळखा…..! कर्मचाऱ्यांना झाली बाधा 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ मुंबई उपनगरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासी सुविधा देणारे एसटी कर्मचारी कोरोना बाधीत झाले आहे. यामध्ये दिवसेंदिवस हा आकडा वाढत असून, ठाणे विभागात सर्वात जास्त 119 कर्मचारी कोरोना बाधीत झाले आहे. तर मुंबई विभाग सुद्धा शंभरी पार करण्याच्या उंबरठ्यावर आहे. दरम्यान, राज्यभरात आतापर्यंत सहा कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एसटी महामंडळात सुद्धा कोरोनाने शिरकाव केला असून, ठाणे विभागात 119 कर्मचारी बाधीत झाले असून त्यातील दोघाचा मृत्यु झाला आहे.

त्याप्रमाणेच मुंबई 99 तर एकाचा मृत्यु तर मुंबई मध्यवर्ती कार्यालय 5 जण बाधीत झाले असून त्यापैकी एकाचा मृत्यु झाला आहे. त्यानुसार राज्यातील विविध विभागातील आकडेवारी मिळून राज्यभरात एकूण 289 कर्मचारी बाधीत असून, सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला आहे.

मात्र, दुसरीकडे यातून दिलासा देणारी माहितीही एसटी महामंडळाने दिली असून, 289 बाधीत कर्मचाऱ्यापैकी 127 कर्मचारी उपचार घेऊन बरे झाले आहेत, तर 156 कर्मचाऱ्यांवर रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे ही एसटी महामंडळ प्रशासनाने सांगितले आहे.

मध्यवर्ती कार्यालयात कोव्हिड केअर सेंटर
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी एसटीच्या मुख्यालयाच्या इमारतीमधील विश्रामगृहाला कोविड सेंटरमध्ये रुपांतरीत करण्याचे महामंडळाच्या विचाराधीन आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेने आधीच विविध ठिकाणी कोव्हिड सेंटर उभारले असताना एसटीच्या कोव्हिड सेंटरला महानगरपालिकेची मान्यता असल्याशिवाय उभारता येणार नसल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले….⭕

anews Banner

Leave A Comment