• Home
  • **चांदवड : धनगर समाजाच्या वतीने पंतप्रधान व मुख्यमंत्रीना निवेदन**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

**चांदवड : धनगर समाजाच्या वतीने पंतप्रधान व मुख्यमंत्रीना निवेदन**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

**चांदवड : धनगर समाजाच्या वतीने पंतप्रधान व मुख्यमंत्रीना निवेदन**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब व माननीय उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री धनगर समाज हा रणावनात फिरणारा व मेंढपाळ करणारा समाज आहे या समाज्यावर वाढते अन्याय अत्याचार हल्ले व नैसर्गिक आपत्ती असे संकट तात्काळ बंद करण्यासाठी विशेष कायद्याची तरतूद करावी व गाव गुंड, जंगली प्राण्यापासून संरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळणे या बाबत धनगर समाजाच्या वतीने माननीय पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना लेखी निवेदनाद्वारे अवगत करण्यात आले व तसेच बंदिस्त शेळी मेंढी पालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी जमिनीसह कायमस्वरूपी किमान 25 लाखापर्यंत आर्थिक अनुदान भेटण्याची व्यवस्था करावी असेही सांगण्यात आले व आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही महाराष्ट्र भर लोकशाही मार्गाने आंदोलन करू या दरम्यान काहीही घटित घटना घडल्यास शासन जबाबदार असेल असे सांगण्यात आले .
असे निवेदन चांदवड तालुक्यातील धनगर समाजाच्या चांदवड यशवंत सेना तालुका उपप्रमुख पिंटू भाऊ गाढे व कार्यकर्ते शांताराम राजनोर,सोपान रंगनाथ,ज्ञानेश्वर ठोंबरे,ज्ञानेश्वर तात्याबा,शंकर वाघमोडे,दत्तू ठोंबरे,निलेश वाघमोडे, प्रदीप ठोंबरे,किशोर,दौलत कुंभार्डे व महेंद्र शेळके समाज बांधव यांच्या वतीने तहसीलदार साहेब प्रदीप पाटील यांना देण्यात आले.

anews Banner

Leave A Comment