Home Breaking News संपादकीय अग्रलेख…* *ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती निर्णय* *सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?* *छिनाल...

संपादकीय अग्रलेख…* *ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती निर्णय* *सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?* *छिनाल वरमाई अन बारा टिकलीनं व-हाड*

115
0

*संपादकीय अग्रलेख…*
*ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती निर्णय* *सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?*
*छिनाल वरमाई अन बारा टिकलीनं व-हाड*
वाचकहो,
खरं तर आजचा अग्रलेख लिहतांना दिलेले शिर्षक हे आम्हांला देखील थोडं नाईलाजानेच लिहावे लागत आहे.जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आमचा हा भारत देश.येथील लोकशाही प्रणालीनुसार सगळे कारभार चालतात.आणि या लोकशाहीचे सगळ्यात मोठे समिकरण म्हणजे निवडणूका!मात्र आता या निवडणूकांनाच संपविण्याच घाट शासनाने घातलाय..म्हणजे हि लोकशाहीची क्रुर थट्टा आहे.अर्थात मग या देशात लोकशाही आहे की नेमकी हुकूमशाही असा प्रश्न पडतो.म्हणूनच म्हणावे लागते “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?”महाराष्ट्रातील ज्या ग्रामपंचायतच्या सरपंचचा कार्यकाळ संपलेला आहे,त्या ग्रामपंचायतीवर आता पालकमंत्र्याच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे गावातील योग्य व सक्षम व्यक्तीची प्रशासक म्हणून ग्रामपंचायतीवर नियुक्ती करतील असा हुकूमशाही फतवा शासनाने काढलेला आहे.तो गैरच नसून चुकीचा देखील आहे.त्यामुळे लोकशाही प्रणाली संपविण्याचाच हा विश्वासघातकी डाव आहे!वास्तविक कोरोना महामारी संकटामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणूका घेणे शक्य नाही या बाबीशी आम्ही सहमत आहोत मात्र लोकशाहीची गळचेपी करुन आपल्याच बगलबच्च्यांना व गावागावातील विविध पक्षाच्या अंटर पंटराना खिरापत वाटण्यासारखा हा प्रकार असून त्यामुळे महाराष्ट्रभरात मोठाच जनक्षोम उफाळून येईल.व गावागावात वादविवाद होऊन मोठाच गोंधळ निर्माण होऊन हाणामारीसारखे प्रकार देखील या शासनाच्या विश्वासघातकी निर्णयामुळे उदभवू शकतात याचा शासनाने गांभिर्याने विचारच केलेला नाही.एकंदरीत काय तर…लग्नकार्याची जबाबदारी ज्या अनुभवी बुजूर्ग म्हाताऱ्या वरमाईकडे सोपविली तीच म्हातारी छिनाल वरमाई आपल्या बारा टिकलीच्या व-हाडासोबत लोकशाहीचा खेळखंडोबा करायला निघाली आणि हुकूमशाही पध्दतीने लोकशाहीचा पुरता तमाशा मांडून बसली आहे.अशी आजच्या घडीची परिस्थिती आहे.म्हणूनच शासनाने घेतलेला हा विश्वासघातकी निर्णय त्वरीत मागे घ्यावा असेच आम्हांला येथे सांगावयाचे आहे.जेथे महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा कार्यकाळ संपलेला आहे तेथे तेथे शासनाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून ग्रामसेवकाचा किंवा त्या त्या भागातील पत्रकारांचा ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्तीचा नव्याने अध्यादेश काढून अधिसुचना जारी करावी म्हणजे हा निपक्षपातीपणा ठरेल,अन्यथा गावागावात मोठा गोंधळ निर्माण होऊन भयानक असे हाणामारीसारखे प्रकार निर्माण होतील.म्हणजे लग्नकार्याची जबाबदारी सोपविलेल्या व-हाडातील छिनाल वरमाईच्या गावागावातील अंटर पंटराना खुश करण्याच्या नादातच बारा टिकंलीन व-हाड मात्र मग लोकशाहीचा गावागावात धांगडधिंगा मांडल्याशिवाय राहणार नाही याचा आता तरी शासनाने पुर्नविचार करणे गरजेचे आहे.एवढेचे यानिमिताने..!🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here