Home Breaking News 🛑 अपमान सहन न झाल्याने दाम्पत्याने घेतले विष 🛑 ✍️पुणे :( विलास...

🛑 अपमान सहन न झाल्याने दाम्पत्याने घेतले विष 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

101
0

🛑 अपमान सहन न झाल्याने दाम्पत्याने घेतले विष 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

ओतूर  -उंब्रज नं 1 (ता. जुन्नर):⭕ येथे लॉकडाऊनदरम्यान शेतकरी कुटुंबाला घेऊन जाणाऱ्या पिकअप जीपला पोलिसांनी अडवले. पोलिसांसोबत झालेल्या बाचाबाचीतून अपमानास्पद धृवाटून राग अनावर झाल्याने घरी येऊन पती- पत्नीने विषारी औषध आणले. पोलिसांसमक्ष औषध प्राशन केले. यात पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच पतीनेही टोकाचे पाऊल उचलत औषध प्राशन केले. अनुजा रोहिदास शिंगोटे (वय 40, रा. उंब्रज नं. 1, ता. जुन्नर), असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. पती रोहिदास यांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलविले आहे.
घटनेनंतर पती रोहिदास कुषाबा शिंगोटे (वय 45, रा. उंब्रज) यांना ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते. मात्र, उपचाराकरिता डॉक्‍टर उपलब्ध नसल्याने गावातील डॉ. कुटे हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल केले. यावेळी उपचारादरम्यान अनुजा यांचा मृत्यू झाला. रोहिदास यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नारायणगाव येथील डॉ. सदानंद राऊत हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथून प्रथमोपचार करून त्यांना पुणे येथे हलविले आहे.
दरम्यान, कुटुंबाच्या नातेवाइकांनी मयत अनुजा यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दर्शविला होता. त्यानंतर त्यांच्या मागणीतून संबंधित पोलीस कर्मचारी व आरोग्य विभाग यांनी केलेल्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्‍त करीत संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. पुणे पोलीस विभागाचे अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. ओतूर पोलीस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे करीत आहेत.
हॉस्पिटल परिसरात फौजफाटा अन्‌ आक्रोश

नगर- कल्याण महामार्गावरील डॉ. कुटे हॉस्पिटलबाहेर संतप्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र डुड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना, पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, आरसीपीचे 36 जवान व पोलीस फौजफाट्यासह याठिकाणी हजर झाले. पोलिसांनी संतप्त जमाव पांगविला. माजी आमदार शरद सोनवणे यांनी भेट देऊन नातलग व अधिकाऱ्यांची बाजू समजून घेऊन संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याठिकाणी अनुजा व गंभीर रोहिदास शिंगोटे यांचे नातलग टाहो फोडत असल्याचे पाहून जमावातून संतापाचा सूर उमटला होता.

नारायणगाव -पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा अपमान सहन न झालेल्याने शेतकरी महिला अनुजा शिंगोटे यांच्या आत्महत्येची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुहास वरके यांना सखोल चौकशीचे आदेश दिल्याची माहिती शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी दूरध्वनी करून शेतकरी कुटुंबाला योग्य न्याय देण्याबरोबरच शासनाकडून आर्थिक मोबदला देण्यात येईल असे सांगून आश्‍वास्त केले आहे. तसेच दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना शासन होऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला असल्याचे आढळराव यांनी नमूद केले…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here