• Home
  • 🛑 ❗पुण्यात थरार❗सराईत गुन्हेगाराचा घरात घुसून… कोयत्याने वार करून खून 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 ❗पुण्यात थरार❗सराईत गुन्हेगाराचा घरात घुसून… कोयत्याने वार करून खून 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 ❗पुण्यात थरार❗सराईत गुन्हेगाराचा घरात घुसून… कोयत्याने वार करून खून 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

कोंढवा/पुणे : -⭕पुण्यात सराईत गुन्हेगाराचा राहत्या घरात घुसून कोयत्याने सपासप वार करून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, तपास सुरू केला आहे.

घनश्याम उर्फ पप्पू पडवळ (रा. कोंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पप्पू पडवळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो पूर्वी कार चालक होता. त्याच्यावर एका टोळीकडून गॅंगकडून वार करण्याचे प्रयत्न झाले होते. त्यात त्यांचे वाद देखील होते. सध्या तो व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करत होता.

तो राहण्यास कोंढवा परिसरात होता. त्याच्यावर अज्ञातांनी राहत्या घरात शिरून सपासप वारकरून खून केला. हा प्रकार उघडकीस येताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत….⭕

anews Banner

Leave A Comment