Home Breaking News 🛑 ❗संतापजनक ❗निर्लज्ज जोशुआ नंतर केतकी चितळेनी… महाराजांचा केला एकेरी उल्लेख…! 🛑...

🛑 ❗संतापजनक ❗निर्लज्ज जोशुआ नंतर केतकी चितळेनी… महाराजांचा केला एकेरी उल्लेख…! 🛑 ✍️मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज ) मुंबई :⭕ मुंबईत अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या

204
0

🛑 ❗संतापजनक ❗निर्लज्ज जोशुआ नंतर केतकी चितळेनी… महाराजांचा केला एकेरी उल्लेख…! 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ मुंबईत अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबद्दल स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने विनोदातून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. अखंड भारताचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा करताना तिने महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे देशातील समस्त शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

अग्रिमा म्हणाली की, शिवाजी या पुतळ्याबाबत अधिक माहिती जाणण्यासाठी मी इंटरनेटच्या सोर्सवर गेली तर त्याठिकाणी सगळं कोरं होतं. कोणीतरी निबंध लिहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी पुतळ्याचा मास्टरस्ट्रोक आहे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता येईल, दुसऱ्या एकाला वाटलं काहीतरी क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट आहे, तो म्हणाला, या जीपीएस ट्रेकरसुद्धा असणार आहे शिवाय त्यांच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जी अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर नजर ठेवेल.
तर तिसरा व्यक्ती येऊन सांगतो, शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, बस्स मी त्यालाच फॉलो केलं” अशा शब्दात अग्रिमाने विनोद केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

यानंतर संपूर्ण राज्यात एक संतापाची लाट उसळली आहे. मात्र, मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने जोशुआची अक्कल ठीकाण्यावर आणण्याऱ्या मावळ्यांचीच अक्कल काढली आहे. ‘शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा’ ! अशी संतापजनक फेसबुक पोस्ट केतकी चितळे हिने केली आहे.

इतकच नाही तर ‘सोशल मिडीयावर ‘मराठी’ असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे २० ते २५ वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कस चे रिंग मास्टर असतात. अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!! सुधारणा करा बाळांनो, शिका’. असंही केतकी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये पुढे म्हणत आहे.

केतकी चितळेची फेसबुक पोस्ट..!

दरम्यान, दुसरीकडे मनसेने आपल्या चीर-परिचित ‘खळ खट्याक’ अंदाजात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा बदनामी करणारा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी पोहचून पूर्ण थेटर फोडले आहे.

मनसे कार्यकर्ते यश रानडे आणि कार्यकर्त्यांनी हा कारनामा केला आहे. आता केतकी चितळेच्या या पोस्टने शिवप्रेमींच्या भावना अजूनच तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे याचे पडसाद उमटणार हे मात्र नक्की….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here