Home Breaking News 🛑 बार्शीच्या “सागर” ने बनवला चक्क सोन्याचा मास्क…! किंमत ऐकून हैराण व्हाल…!...

🛑 बार्शीच्या “सागर” ने बनवला चक्क सोन्याचा मास्क…! किंमत ऐकून हैराण व्हाल…! 🛑 ✍️सोलापूर :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

443
0

🛑 बार्शीच्या “सागर” ने बनवला चक्क सोन्याचा मास्क…! किंमत ऐकून हैराण व्हाल…! 🛑
✍️सोलापूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

बार्शी/सोलापूर:⭕ बार्शीच्या एका पठ्ठ्याने चक्क सोन्याचा मास्क बनवला आहे. हा मास्क तब्बल 5 तोळ्यांचा आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात मास्कच्या माध्यमातून होणाऱ्या चमकोगिरीची संपूर्ण शहरात चर्चा होताना दिसत आहे. हौसेला मोल नसते हे आता बार्शीत खरे ठरताना दिसत आहे.

सागर जानराव असं या सोन्याचा मास्क बनवणाऱ्या हौशी व्यक्तीचं नाव असून त्यांनी बार्शी येथील चांदमल ज्वेलर्स या दुकानातून हा मास्क तयार करुन घेतला आहे. या मास्कची अंदाजे किंमत दोन लाख चाळीस हजार एवढी आहे. हा तरुणही जवळपास 1 किलो सोनं दररोज वापरतो. सागर यांचा हॉटेल तसेच रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे.

याविषयी सागर यांनी सांगितले की, मित्रांनी मला कल्पना सुचवली की, सोन्याचा मास्क तयार करून घेता येईल.
कल्पना आवडली आणि मास्क तयार करून घेतला. आज देशामध्ये सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. सोने 50 हजारांच्या वर पोहोचले आहे. अशावेळी रोजच्या वापरातील मास्कच सोन्याचा बनवून घेतल्याने या इसमाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

यापूर्वी सोन्याचा साडे पाच तोळ्याचा मास्क पिंपरी चिंचवडचे शंकर कुऱ्हाडे यांनी बनवला आहे. या साडे पाच तोळ्याच्या या मास्कसाठी तब्बल दोन लाख 90 हजार रुपये खर्च केले आहेत.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here