Home Breaking News 🛑 औरंगाबाद पशुसंवर्धन विभागाकडून…! कोंबडीची अडीच हजार पिल्ले वाटणार 🛑 ✍️औरंगाबाद:( विजय...

🛑 औरंगाबाद पशुसंवर्धन विभागाकडून…! कोंबडीची अडीच हजार पिल्ले वाटणार 🛑 ✍️औरंगाबाद:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

143
0

🛑 औरंगाबाद पशुसंवर्धन विभागाकडून…! कोंबडीची अडीच हजार पिल्ले वाटणार 🛑
✍️औरंगाबाद:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

औरंगाबाद :⭕ जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून ५० टक्के अनुदानावर लाभार्थ्यांना कोंबडीच्या एक दिवसाच्या सुमारे २ हजार ५०० पिलांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठीच्या लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

पशुसंवर्धन विभागाच्यावतीने एकात्मिक कुक्कुट विकास योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील, भूमीहीन शेतमजूर, मागासवर्गिय, अल्प व अत्यल्प भूधारकांना कोंबडीच्या एक दिवसाच्या पिलांचे ५० टक्के अनुदानावर वाटप करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या विशेष घटक योजना काही विशिष्ट समाज घटकांसाठी आहेत, मात्र ही योजना सर्वसमाज घटकातील गरजूंसाठी आहे. याअंतर्गत एक दिवसाच्या पिलांचे वाटप केले जाते.

प्रति लाभार्थ्यांना १०० पिलांचे वाटप करण्यात येते.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. एस. कांबळे यांनी सांगीतले, की प्रति लाभार्थ्यासाठी १६ हजार रूपयांची ही योजना आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्याला ५० टक्के अनुदान देण्यात येते. याअंतर्गत शासनाच्या अनुदानातून लाभार्थ्यांना दोन हजार रूपयांची एक दिवसांची पिल्ले पुरवण्यात येतात. तसेच त्यांच्या खाद्यासाठी ६ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. तर लाभार्थ्यांना स्वहिश्‍यातून कोंबड्यांसाठी शेड, वाहतुक खर्च, उर्वरीत खाद्य, औषधी, पाणी व खाद्याची भांडी घेण्यासाठी खर्च करणे अपेक्षित असल्याचे सांगितले.

एक जुलैपासून अर्ज वाटप व स्वीकारण्याला सुरवात झाली आहे. ३० जुलैपर्यंत पंचायत समिती कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे स्वीकारण्यात येईल. या योजनांचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन सभापती तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. एस. कांबळे यांनी केले.

कोंबडीशिवाय जन्मलेली पिले

पडेगाव येथील मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्रातून शासकीय योजनांसाठी व पोल्ट्री व्यावसायिकांना पुरवली जातात. या ठिकाणी पिले कोंबडीशिवाय जन्मलेली असतात. इन्क्युबेटरमध्ये एकाचवेळी पाच हजार पिले तयार करणारी यंत्रणा या ठिकाणी आहे. या ठिकाणाहून शासकिय दरात एक दिवसांची पिल्ले लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिली जातात….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here