• Home
  • 🛑 तुकाराम मुंढेंना दणका; स्मार्ट सिटीच्या सीईओपदावरून हटवले 🛑 ✍️( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 तुकाराम मुंढेंना दणका; स्मार्ट सिटीच्या सीईओपदावरून हटवले 🛑 ✍️( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 तुकाराम मुंढेंना दणका; स्मार्ट सिटीच्या सीईओपदावरून हटवले 🛑

✍️( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नागपूर, 11 जुलै : ⭕ महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना नागपूर स्मार्ट सिटीच्या सीईओपदावरून हटवण्यात आले आहेत. महेश मोरोने यांच्याकडे स्मार्ट सिटीचे प्रभारी सीईओपद सोपवण्यात आले आहे. स्मार्ट सिटीत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत सत्ताधारी भाजपतर्फे गेल्या काही दिवसांपासून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरू आहेत.

महेश मोरोने काही काळ आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतील. तसंच, काही दिवसांतच पूर्ण वेळ सीईओ नेमण्यासाठी जाहिरात काढण्यात येणार असल्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटीचे संचालकपद आणि सीईओपद बळकवल्याचा आरोप आजच्या बैठकीत सिद्ध झाल्याचं नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितलं आहे.

संचालक मंडळाची परवानगी न घेता नियमबाह्यपणे मुंढे यांनी सीईओपद बळकावले. एका कंपनीची २० कोटींची देणी अदा केली, काही कर्मचाऱ्यांना संचालक मंडळाची अनुमती न घेता बडतर्फ केले, असा ठपका ठेवण्यात आला. ते सगळे मुद्दे आजच्या बैठकीत, चेअरमनच्या साक्षीने उपस्थित केले गेले.

नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या (एनएसएससीडीसीएल) संचालक मंडळाची झालेली बैठक चांगलीच वादळी ठरली आहे. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावर १४ संचालक आहेत. त्यात महापौर, सत्तापक्षनेते, विरोधीपक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष असे सहा महापालिकेशी संबंधित आहेत. पोलिस आयुक्त, नासुप्र सभापती, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त असे चार अधिकारी, केंद्र सरकारचे एक अधिकारी आणि दोन स्वतंत्र संचालक आणि स्मार्ट सिटीचे चेअरमन असे चौदा संचालक आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment