Home Breaking News 🛑 सिंधुदुर्गात ७ ऑगस्टनंतर प्रवेशबंदीचे….! ‘ते’ टिपण अखेर रद्द 🛑 ✍️( विजय...

🛑 सिंधुदुर्गात ७ ऑगस्टनंतर प्रवेशबंदीचे….! ‘ते’ टिपण अखेर रद्द 🛑 ✍️( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

76
0

🛑 सिंधुदुर्गात ७ ऑगस्टनंतर प्रवेशबंदीचे….! ‘ते’ टिपण अखेर रद्द 🛑
✍️( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सिंधुदुर्ग : ⭕ गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पुण्यातून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या एका इतिवृत्ताने गोंधळ उडवून दिल्यानंतर त्यावर आज महत्त्वाची पावले टाकण्यात आली आहेत.

जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी यायचे असेल तर ७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत पोहचावे. त्यानंतर कोणालाही जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. गृह विलगीकरणाचे नियम मोडल्यास वा ई-पासशिवाय जिल्ह्यात प्रवेश कल्यास ५ हजार रुपये दंड वसूल केला जाईल, अशा प्रकारचे जिल्हाधिकारी

परजिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी यायचे असेल तर ७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत पोहचावे. त्यानंतर कोणालाही जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. गृह विलगीकरणाचे नियम मोडल्यास वा ई-पासशिवाय जिल्ह्यात प्रवेश कल्यास ५ हजार रुपये दंड वसूल केला जाईल, अशा प्रकारचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या बैठकीतील इतिवृत्त समोर आल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. हा अंतिम आदेश नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यानंतरही चाकरमान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. त्या वादावर आज पडदा टाकण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतील संबंधित वादग्रस्त टिपण आज रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री.

यांनी झूम अॅपद्वारे जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेतली. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, आमदार वैभव नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे आदी उपस्थित होते. यावेळी चाकरमान्यांना.

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतील संबंधित वादग्रस्त टिपण आज रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांनी झूम अॅपद्वारे जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेतली. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, आमदार वैभव नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे आदी उपस्थित होते. यावेळी चाकरमान्यांना गणेशोत्सव कालावधीत जिल्ह्यात येण्यास डेडलाइन ठरवणाऱ्या व प्रवेशबंदीचे संकेत देणाऱ्या टिपणवर चर्चा झाली. त्यानंतर सदर वादग्रस्त टिपण रदद् करण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतील इतिवृत्तावरून बरंच वादळ उठलं आहे. त्यावर भाजपचे राज्यसभा सदस्य व कोकणातील नेते नारायण राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. गणेशोत्सव आणि कोकणी माणसाचं अतूट नातं आहे. त्यामुळे गणेशोत्सवात चाकरमान्यांना कोकणात जायला बंदी घालू नये. सरकारने कोकणात जायला बंदी घातल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राणे यांनी दिला. त्याआधी आमदार आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला. ‘लालबागच्या राजाची आणि भक्तांची ताटातूट करू नका, तसेच कोकणातील चाकरमान्यांची आणि बाप्पाची भेट कशी होणार? याची आम्ही सरकारकडे विचारणा केली होती. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करुन चाकरमान्यांची कोंडी करण्याचा प्लॅन तयार केला? परस्पर घोषणा केली? सरकारला हे मान्य ?’ असं ट्विट करत या संपूर्ण गोंधळावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या पार्श्वभूमीवर वाद अधिक न वाढवता संबंधित वादग्रस्त टिपण रद्द करण्यात आले आहे.

– परजिल्ह्यांतून सिंधुदुर्गात येणाऱ्या गणेशभक्तांना ७ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच प्रवेश देण्यात येईल…..⭕

Previous article🛑 तुकाराम मुंढेंना दणका; स्मार्ट सिटीच्या सीईओपदावरून हटवले 🛑 ✍️( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
Next article🛑 मुख्यमंत्री सहाय्यता निधीला बॅक ऑफ बडोदाची 1 कोटींची मदत 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here