Home Breaking News फळबाग लागवड करुन उत्पन्न वाढवा ; खासदार प्रताप पाटील चिखलीकर – ...

फळबाग लागवड करुन उत्पन्न वाढवा ; खासदार प्रताप पाटील चिखलीकर – नांदेड, दि. ७ ; राजेश एन भांगे

125
0

फळबाग लागवड करुन उत्पन्न वाढवा ; खासदार प्रताप पाटील चिखलीकर –
नांदेड, दि. ७ ; राजेश एन भांगे

कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत जिल्ह्यात 1 ते 7 जुलै यादरम्यान कृषी संजीवनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील गावात कृषी योजनांचा जागर सुरू आहे. यामध्ये उत्पादन तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली जाते आहे.

रविवार 5 जुलै रोजी कंधार तालुक्यात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या उपस्थितीत चिखली येथे फळबाग लागवडीचा शुभारंभ व जलपुजन करण्यात आले. यावेळी चिखलीचे सरपंच श्रीमती ललीताबाई चिखलीकर, संतोष क्षिरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, बारूळ मंडळ कृषी अधिकारी आर. एम. भुरे, कृषी पर्यवेक्षक बालाजी डफडे, कृषी सहाय्यक सौ. उज्वला देशमुख, परमेश्वर मोरे, गोविंद तोटावाड, एम. एम. राठोड, गोगदरे, शेतकरी प्रकाश तोटावाड, सतीश पवळे, माजी सरपंच पांचाळ, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

कंधार तालुक्यात आज अखेर कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत तालुक्यातील 85 गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कंधार तालुक्यातील पानभोसी, बहादरपुरा, शिरढोण, आलेगाव, हाळदा, चिंचोली प क येलूर, अंबुलगा, उस्माननगर, लाठ खू, फुलवळ, पानशेवडी, बारुळ या गावासह एकूण 85 गावात हा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमात गावातील सरपंच, प्रगतशील शेतकरी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली शेतकरी बैठका घेऊन विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. विविध गावांना भेटी देत शेतकऱ्यांना पीक उत्पन्नावाढीच्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येत आहे.

तालुक्यातील विविध गावात मंडळ कृषी अधिकारी पवनसिंह बैनाडे, विकास नारळीकर, आर. एम. भुरे, कृषी पर्यवेक्षक रोहीणी पवार, आत्माराम धुळगुंडे, अहेमद खॉ पठाण, बालाजी डफडे, संभाजी डावळे, दत्ता रामरूपे यांच्यासह कृषी सहाय्यक सोपान उबाळे, परमेश्वर मोरे, शिवाजी सूर्यवंशी, सुनील देशमुख, गोविंद तोटावाड, माधव गुट्टे, कल्पना जाधव, भूषण पेटकर, एन. बी. कुंभारे, गजानन सूर्यवंशी, संतोष वाघमारे, जी. एम. कळणे यांच्यासह तालुक्यातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गाव बैठका घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहिती, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड एकात्मिक किड रोग व्यवस्थापन एकात्मिक खत व्यवस्थापन, लिंबोळी अर्क तयार करणे, सोयाबीन उगवण यासह पिक विमा राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना, ठिबक सिंचन, कृषी यांत्रिकीकरण फळबाग लागवड, शेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजना याबद्दल माहिती व मार्गदर्शन करण्यात येत आहे. गावा-गावात माहितीपत्रके शेतकरी मासिके देऊन नवीन वर्गणीदार करून घेण्यासाठी माहिती दिली. कंधार अंतर्गत प्रचार वाहन व त्यावर ध्वनिक्षेपक लावून गावोगावी मार्गदर्शन करण्यात येत आहे. तालुक्यातील संपूर्ण गावात जनजागृती करून कार्यक्रम घेण्यात येत आहे. कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, पोखर्णी तसेच कापूस संशोधन केंद्र नांदेड येथील शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Previous articleगगनबावडा तालुक्यात 86.50 मिमी पाऊस* *मोहन शिंदे ब्यूरोचिफ युवा मराठा न्यूज .*
Next articleकोरोनातून १ रूग्ण बरा झाला व १६ व्यक्ती कोविड बाधित तर दोन रूग्णांचा मृत्यू – नांदेड, दि. ७ ; राजेश एन भांगे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here