Home Breaking News 🛑 टाटा पुन्हा मदतीला धावले..! मुंबई मनपाला १० कोटी, १०० व्हेंटीलेटर्स, २०...

🛑 टाटा पुन्हा मदतीला धावले..! मुंबई मनपाला १० कोटी, १०० व्हेंटीलेटर्स, २० रुग्णवाहिका 🛑 ✍️ मुंबई :( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज

75
0

🛑 टाटा पुन्हा मदतीला धावले..! मुंबई मनपाला १० कोटी, १०० व्हेंटीलेटर्स, २० रुग्णवाहिका 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई:⭕- हजारो कोटी रुपयांची मदत कोरोना लढ्यासाठी देऊ करणाऱ्या टाटा ग्रुपने आज पुन्हा एकदा मदतीचा हात देऊ केला आहे. कोरोनाचा सर्वाधिक कहर झेलणाऱ्या मुंबई महापालिकेला टाटा सन्सकडून प्लाझ्मा थेरपीसाठी मोठी मदत देऊ केली आहे. ही मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई मनपा आणि टाटा समुह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समुहातर्फे महापालिकेला वीस रुग्णवाहिका, १०० व्हेंटिलेटर्स आणि दहा कोटींचे अर्थ सहाय्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर आदी यावेळी उपस्थित होते. समाजातील प्रत्येक घटक एकत्र येऊन जेव्हा संकटाशी मुकाबला करतात त्यावेळेस यश नक्की मिळते. त्याच जिद्दीने कोरोनाशी लढा देताना टाटा समुहासारख्या उद्योग संस्था शासनाच्या खांद्याला खांदा लावून लढा देत आहे. आपण कोरोनाच्या लढाईत नक्कीच विजयी होऊ, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला. कोरोना सारख्या संकटात अनेक संस्था, व्यक्ती सामाजिक जाणीवेतून पुढे आल्या आहेत. टाटा समुह सुरूवातीपासूनच राज्य शासनाच्या सोबत पूर्ण ताकदीने उभा राहीला आहे. कोरोनाचे संकट संपविण्याच्या जिद्दीने आपण सर्वच उतरलो आहोत. शासनासोबत नागरीक आणि मोठे उद्योजक खांद्याला खांदा लावून लढत आहेत. सर्वच जण अविश्रांत मेहनत करीत आहेत. त्यात यश आल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.मंत्री आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले, कोरोना कळात पहिल्या दिवसापासून सहकार्यासाठी टाटा समुहाचा सहभाग राहिला आहे. आताही त्यांनी २० रुग्णवाहिका, १०० व्हेंटीलेटर्स आणि प्लाझ्मा थेरपीसाठी १० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे. खर तर हे साहित्य वापरण्याची वेळ येऊ नये अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो असे सांगत त्यांनी टाटा समुहाने केलेल्या मदतीबद्दल आभार देखील मानले.

कोरोनामुक्त होण्यासाठी निर्भयपणे पावले उचचलील जात आहे त्यामुळे महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास मंत्री अस्लम शेख यांनी यावळी व्यक्त केला. यावेळी महापौर श्रीमती पेडणेकर, टाटा समुहाचे अध्यक्ष एन. चंद्रा यांनी मनोगत व्यक्त केले….⭕

Previous article🛑 वारजे स्मशानभूमीला मरण कळा 🛑 ✍️ पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा )
Next articleखासदार उदयनराजे यांच्या कडून शहरातील ग्रेड सेपरेटरची पाहणी 🛑 ✍️सातारा :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here