• Home
  • *चेंबूर पूर्व येथील एम.एम.आर.डी.ऐ वसाहतील जनता नगरसेवक निधीतून मिळणारे मास्क, सॅनिटायजर तसेच विटामिन सी गोळ्यांपासून वंचीत…*

*चेंबूर पूर्व येथील एम.एम.आर.डी.ऐ वसाहतील जनता नगरसेवक निधीतून मिळणारे मास्क, सॅनिटायजर तसेच विटामिन सी गोळ्यांपासून वंचीत…*

🛑 *चेंबूर पूर्व येथील एम.एम.आर.डी.ऐ वसाहतील जनता नगरसेवक निधीतून मिळणारे मास्क, सॅनिटायजर तसेच विटामिन सी गोळ्यांपासून वंचीत…*🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ *चेंबूर पूर्व वार्ड क्रमांक १८७*
मधील एम एम आर डी वसाहतीतील जनता नगरसेवक निधीतून मिळणारे मास्क, सॅनिटायजर तसेच विटामीन सी या गोळ्यांपासून वंचीत आहे. तसेच तेथील नगरसेवक यांना वारंवार सांगून सुद्धा येथील समस्यांवर त्यांनी कानाडोळा केलेला आहे. येथील लोकप्रतिनीधी कडून कोणत्याही प्रकारची कामे कोरोना सारख्या महाभयंकर आजारात होत नाहीत याची खंत वाटतेय. तसेच तेथील कोरोना रुग्णांना कोणत्याही प्रकारची मदत पोहचत नसून सध्या तेथील सामान्य नागरिक त्रासावले आहेत. सध्या बचावासाठी सॅनिटायजर फवारणी आणि धुर फवारणी सुद्धा होत नाही आहे.
विभागात मोलमजुरी आणि हातावर काम असणाऱ्याची संख्या जास्त असल्याने त्यांना अशा भयंकर आजरात सामोरे जावे लागत आहे. अन्नाचा तुटवडा या मोलमजुरी करणाऱ्या मजुरांना होत आहे…⭕

anews Banner

Leave A Comment