🛑 यासाठी नक्किच खा मोड आलेली कडधान्ये 🛑
⭕आरोग्य विषयक ⭕
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
✍️मोड आलेली कडधान्ये म्हटलं की समोर येत ते चवदार हुलग्याचे कढण, गरम गरम मटकीची उसळ किंवा मिसळ.कडधान्ये खाणे हे शरीरासाठी उत्तम असते. पण त्यातल्या त्यात मोड आलेली कडधान्ये खाणे अतिउत्तम असते. मूग, मटकी, वाल, हरभरा, वटाणा, ही कडधान्ये नियमित आहारात खाणे आरोग्यासाठी चांगले आणि फायदेशीर आहे.
हे आहेत कडधान्ये खाण्याचे फायदे :-
१) सकाळी उठल्यावर नाश्त्यामध्ये मोड आलेली कडधान्ये खाल्याने शरीराला प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतात.
२) वजन कमी करायचे असेल तर मोड आलेली कडधान्ये नियमितपणे खात जा.
३) शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते.
४) साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.
५) सकाळी नाश्त्याला मोड आलेली कडधान्ये खाल्ली तर तुमचा दिवस फ्रेश जाईल तसेच दिवसभर उत्साह टिकून राहील. ६) मोड आलेल्या कडधान्यामधील व्हिटॅमिन आणि मिनरल्स तुमच्या केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असतात.⭕