Home सामाजिक परराज्यातून येणाऱ्या मजुरांबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार

परराज्यातून येणाऱ्या मजुरांबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार

88
0

🛑 परराज्यातून येणाऱ्या मजुरांबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार 🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई:⭕ परराज्यातून महाराष्ट्रात आलेले मजूर, कामगार आता त्यांच्या राज्यांमध्ये गेले आहेत. इथले उद्योगधंदे सुरू झाले की ते पुन्हा येतील. त्यामुळे परप्रांतीय मजूर पुन्हा राज्यात येतील तेव्हा त्यांची स्थलांतरित कायद्यांतर्गत नोंद करण्यात यावी, अशी आग्रही मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. राज ठाकरेंच्या या मागणीनंतर राज्य सरकार परराज्यातून येणाऱ्या मजुरांबाबत नवे धोरण आखण्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, राज्यात येणाऱ्या परप्रांतीय मजुरांच्या नोंदणीबाबत धोरण ठरविण्यासाठीच्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.

राज्यात संकट कोणतही मोठं संकट आलं की परप्रांतांमधून आलेले लोकं सर्वात आधी आपल्या राज्यात निघून जातील असं मी याआधी देखील सांगितलं होतं. कोरोनाच्या काळात देखील आता तेच घडताना दिसून येत आहे. त्यामुळे यातून बोध घेऊन परप्रांतियांची एंट्री आणि एक्झिट यावर बंधनं आणायला हवीत. शेवटी प्रत्येक ठिकाणी माणुसकी चालत नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते.
राज्यातले उद्योगधंदे सुरू झाले की परप्रांतीय पुन्हा येतील. त्यावेळी त्यांची चाचणी करुनच त्यांना राज्यात प्रवेश देण्यात यावा. आपल्या राज्यातील परिस्थिती आपल्याला माहीत आहे. मात्र तिथल्या परिस्थितीची कल्पना आपल्याला नाही. त्यामुळे येताना त्यांची तपासणी केली जावी, अशी सूचनी देखील राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत दिल्या होत्या. त्यामुळे राज ठाकरेंची आणखी एक मागणी पूर्ण करत ठाकरे सरकार आगामी काळात ऐतिहासिक निर्णय घेणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.⭕

Previous articleमहाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७१ च्या नियम ११ मध्ये सुधारणा करण्यासाठी अधिसूचना ; जिल्हाधिकारी नांदेड*
Next articleयासाठी नक्किच खा मोड आलेली कडधान्ये
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here