• Home
  • मोदकाच्या आकाराचा गरा पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी

मोदकाच्या आकाराचा गरा पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी

🛑 मोदकाच्या आकाराचा गरा पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी 🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

कुडाळ :⭕ तालुक्यातील माणगाव येथे फणसात चक्क मोदकाच्या आकाराचा गरा सापडल्याची चकित करणारी घटना घडली आहे.
वटपौर्णिमा सणाला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वटपौर्णिमेला फणस या फळाला महत्व दिले जाते. आज वटसावित्रीच्या व्रताच्या वाणात फणस असतात. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे एका फणसाच्या गऱ्याला मोदकाचा आकार आल्याचं समोर आलं आहे. खरंतर फणसाच्या गरे हे विशिष्ट आकाराचे असतात. मात्र एका फणसात मोदकाच्या आकाराचा एक गरा पहायला मिळाला.
फणसात सापडलेल्या मोदकाच्या आकाराचा गरा पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली आहे.⭕

anews Banner

Leave A Comment