• Home
  • मुंबई अनलॉक होतेय, पण येत्या १० दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढेल

मुंबई अनलॉक होतेय, पण येत्या १० दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढेल

🛑 ‘मुंबई अनलॉक होतेय, पण येत्या १० दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढेल’ 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 6 जून : ⭕ राज्य सरकारच्या मिशन बिगिन अगेन या धोरणातंर्गत शुक्रवारपासून दुकाने आणि इतर उद्योगधंदे पुन्हा सुरु करण्यात आले. त्यानुसार मुंबईही अनलॉक होईल. पण येत्या १० दिवसांत मुंबईतील रुग्णांची संख्या वाढेल, असा अंदाज मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी व्यक्त केला. आगामी काळातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोविड १९ रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने डॅशबोर्ड तयार केल्याचे काकणी यांनी सांगितले.या डॅशबोर्डवर कुठल्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत, याची माहिती मिळेल. सोमवारपासून हा डॅशबोर्ड कार्यान्वित होईल.

मुंबई हा सध्या राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर घटत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत असलेले दररोज ६.६२ टक्के रुग्णवाढीचे प्रमाण आता ३.५० टक्क्यांवर आले आहे. ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या भायखळा, वरळी, धारावी परिसरांमध्ये रुग्णवाढीचा दर दहा टक्क्यांवरून १.६ ते २.४ टक्के इतका खाली आला आहे. विशेष म्हणजे, पालिकेच्या सहा विभाग कार्यालयांच्या हद्दीतही रुग्णवाढीचा दर तीन टक्क्यांपेक्षा खाली उतरला आहे.⭕

anews Banner

Leave A Comment