• Home
  • रुग्णांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्र्यांची थेट कोरोना वॉर्डात भेट

रुग्णांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्र्यांची थेट कोरोना वॉर्डात भेट

🛑 रुग्णांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्र्यांची थेट कोरोना वॉर्डात भेट 🛑
अमरावती 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

अमरावती:⭕ जिल्हा कोविड रुग्णालयातील दाखल रूग्णांची स्थिती व तेथील सुविधांचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी काल सायंकाळी या रूग्णालयातील कोविड वॉर्डाला भेट देऊन तेथे उपचार घेत असलेल्या रूग्णांना दिलासा दिला.

एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये

गत काही आठवड्यांपासून जिल्हा कोविड रूग्णालयाबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानुसार प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती पाहण्याचा व रूग्णांशी थेट भेटण्याचा निर्णय पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी घेतला व तत्काळ तो अंमलातही आणला.
पालकमंत्र्यांनी काल सायंकाळी सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील स्थापित कोविड रूग्णालयाला भेट दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा कोविड रूग्णालयातील ओपीडी कक्षासह आयसीयू कक्षाचीही पाहणी केली. त्यांनी तेथील कोविड वॉर्डात थेट जाऊन त्यांनी पॉझिटिव्ह असलेल्या व उपचार घेत असलेल्या रूग्णांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. रवी भूषण यांची टीम अहोरात्र मेहनत जोखमीच्या क्षेत्रात जीवाची पर्वा न करता काम करत आहे. पीपीई कीट घालून ही मंडळी दिवसभर रूग्णसेवा देत असते. आज मी स्वत: पीपीई कीट घालण्याचा अनुभव घेतला. उन्हाळ्याचे दिवस असताना पीपीई कीट घालून दिवसभर काम करत राहणे किती कष्टप्रद असते, याचा अनुभव यानिमित्त मिळाला. सगळे डॉक्टर, पारिचारिका, सफाई कर्मचारी अखंडपणे सेवारत आहेत, असे यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

anews Banner

Leave A Comment