Home युवा मराठा विशेष शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

192

🛑 शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं वक्तव्य 🛑
मुंबई :(विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई | राज्यातील शाळा बंद असून त्या पुन्हा सुरु होणार की नाही? याबाबत पालकांच्या मनात संभ्रम आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा लगेच पुन्हा सुरु करणं सध्यातरी अवघड दिसत असल्याचं म्हटलं आहे.

शहरातील शाळा सुरु कराव्यात का असा प्रश्न आहे. मी ज्या शाळेत शिकलो तिथे एका बाकावर दोन विद्यार्थी बसायचे. सध्याही अनेक ठिकाणी असंच सुरु आहे. शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरु कसं करायचं यावर विचार सुरु आहे. , असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

ऑनलाइन पद्धतीने, एखादा चॅनेल घेऊन, मोबाइल कंपन्यांशी बोलून अधिक डेटा देतील येईल का ? अशा अनेक गोष्टींचा विचार सुरु आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
काही जणांचं म्हणणं होतं ग्रीन झोनमधील शाळा सुरु करा. पण अशा अर्धवट पद्धतीने नको असं मी स्पष्ट सांगितलं. वर्गाशिवाय शाळा सुरु कऱण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. यासाठी मी अनेक तज्ञांशी बोलत आहे. ऑनलाइन शिक्षण मोठं आव्हान असून त्यासाठीही प्रयत्न सुरु आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय.

Previous articleमालेगांव तालुक्यात रेशनचा काळाबाजार;ग्राहकांना रेशन देण्यास नकार
Next articleपुणे कोरोनानं हादरलं, कामगाराच्या अचानक मृत्यूनंतर आला धक्कादायक रिपोर्ट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.