• Home
  • मालेगांव तालुक्यात रेशनचा काळाबाजार;ग्राहकांना रेशन देण्यास नकार

मालेगांव तालुक्यात रेशनचा काळाबाजार;ग्राहकांना रेशन देण्यास नकार

*मालेगांव तालुक्यात रेशनचा काळाबाजार;ग्राहकांना रेशन देण्यास नकार?*
*मालेगांव,(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज)-* कोरोना महामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एक अध्यादेश काढून रेशन दुकानदारांनी ज्या नागरिकांकडे रेशनकार्डच नाही अशाही व्यक्तीना प्रति माणसी पाच किलो मोफत तांदुळ व दाळ देण्याचे आदेश दिलेले असतानाही,मात्र त्या आदेशाला केराची टोपली दाखवत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात रेशन दुकानदारांची सर्रास मनमानी सुरु असून ग्राहकांची अडवणूक व पिळवणूक सुरु आहे.
याबाबतीत “युवा मराठा न्युज” कडे ग्राहकांनी थेट दुरध्वनीवरुन संपर्क साधत तालुक्यातील कुकाणे येथील अग्रवाल हे रेशन दुकानदार ग्राहकांना रेशन न देता”तुम्हांला कुठे जायचे,तेथे जा.आम्ही कुणालाच घाबरत नाही”अशा वल्गना करुन ग्राहकांची बोळवण करण्याचा सपाटा लावला आहे.असाच काहीसा प्रकार मालेगांव तालुक्याच्या बहुतांश भागात सुरु असून,आँनलाईन लिंकीग झालेले नसल्याचेही कारण दाखवून ग्राहकांची अडवणूक करुन राजरोसपणे काळाबाजार सुरु आहे.
तरीही या गंभीर प्रकाराकडे मालेगांवचे तहसीलदार राजपूत व पुरवठा निरीक्षक सोवणे यांचे साफ दुर्लक्ष झाल्याचेच चित्र दिसून येत आहे.त्यामुळे मालेगांव तालुक्यात शासन आदेशाचे तीन तेरा नऊ बारा वाजून शासनाच्या निर्णयाला हरताळच फासण्याचे काम तालुक्यात रेशन दुकानदारांकडून सुरु आहे.त्यामुळे लवकरच “युवा मराठा न्युज”च्या माध्यमातून महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचेकडे जनहितार्थ तक्रार दाखल करण्यात येणार आहे.त्याशिवाय ज्या ग्राहकांची रेशन दुकानदारांकडून अडवणूक होत असेल त्यांनी 99233362030 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

anews Banner

Leave A Comment