Home Breaking News जालन्यात कोरोनाचा कहर वाढला आणखी दहा पॉझिटिव्ह

जालन्यात कोरोनाचा कहर वाढला आणखी दहा पॉझिटिव्ह

493

*जालन्यात कोरोनाचा कहर वाढला आणखी दहा पॉझिटिव्ह*
====================
*जालना जिल्ह्याची संख्या 71 वर पोहचली*
=*जालना,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज*)-===================
*जालना जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आज आणखी नवीन दहा रूग्णांची भर पडली असून जिल्ह्याची संख्या आता 71 वर पोहचली असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे. जालना जिल्हा रुग्णालयातर्फे शनिवारी एकूण 106 संशयीत रुग्णांच्या लाळेचे नमुने घेऊन ते काल रविवारी सकाळी प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 105 अहवाल काल रविवारी रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत. त्यात जालना शहरातील जुना जालना भागातील नामांकित असलेल्या एका खाजगी रुग्णालयाशी संबंधित पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच जालना तालुक्यातील पिरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत असलेल्या नूतनवाडी येथील 2,अंबड तालुक्यातील पिरनेर येथील 1,मंठा तालुक्यातील हनुमंतखेडा आणि कानडी येथील प्रत्येकी एक अशा एकूण दहा रुग्णांचा समावेश असून त्यात सहा महिला व चार पुरुषांचा समावेश असल्याचे या सुत्रांनी सांगितले*
====================

Previous articleदहिवडला तरुण शेतकऱ्यांचा विजेचा शाँक लागून मृत्यू.सर्वत्र हळहळ
Next article
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.