
- ⭕ महत्त्वाची बातमी!
रेशन कार्ड नसले तरी ५ किलो तांदूळ मोफत मिळणार ⭕
पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
पुणे : रेशन कार्ड नसलेल्या व्यक्तींनाही आता प्रत्येकी पाच किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मोफत तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे.
मे आणि जून या दोन महिन्यांचे धान्य वितरण लाभार्थ्यांना जून महिन्यापासून ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. अशा लाभार्थ्यांकडून त्यांचे आधारकार्ड क्रमांक किंवा कोणतेही सरकारी ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्याची पुराव्यादाखल स्वतंत्र नोंद करण्यात येईल.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी एकूण ११३ अन्नधान्य वितरण केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
याबाबत २२ मे रोजी आदेश पारित करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत एकूण १ लाख ३९ हजार ८८२ लाभार्थ्यांना मोफत तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे.
यासाठी संबंधित परिमंडल अधिकारी, तलाठी, स्थानिक नगरसेवक आणि अन्नधान्य वितरण केंद्रे यांच्यामार्फत विनारेशन कार्डधारकांना विहीत नमुन्यातील अर्ज वाटप केले जाणार आहेत. अर्ज नजिकच्या अन्नधान्य वितरण केंद्रात 30 मेपर्यंत जमा करायचे आहेत.
ज्या अन्नधान्य वितरण केंद्रामध्ये अर्ज भरुन देतील त्याच अन्नधान्य वितरण केंद्रातून संबंधित व्यक्तींना अन्नधान्याचे वितरण करण्यात येईल. अन्नधान्य घेताना या अर्जाची पोच सोबत आणणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी आपले अर्ज 30 मे पर्यंत जमा करावे, असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी केले आहे…