*कोरोनाने घेतला नगरसेवकाचा बळी.*
कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोल्हापूर शहरातील रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. आज संध्याकाळी आलेल्या वृत्तानुसार कोल्हापूर महापालिकेतील भाजपचे नगरसेवक संतोष गायकवाड यांचे कोरोनाने निधन झाले. संभाजीनगर प्रभागाचे नगरसेवक असणारे गायकवाड हे ते कोल्हापुरातील उत्कृष्ट फुटबॉलपटू होते.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येसोबतच मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या चिंतेत दिवसेंदिवस भरच पडत आहे. आज कोरोनाने नगरसेवकाचा बळी घेतल्याने कोल्हापूर व परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.