**लूट करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये होणार ऑडिट- जिल्हाधिकारी नाशिक**(राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज)
नाशिक – कोरोना संकटात उपचाराच्या नावाखाली काही खासगी रुग्णालये रुग्णांची लूट करत असल्याचे समोर आले आहे. या मनमानीला चाप लावण्यासाठी ऑडिट टीम (तपास पथक) तयार करण्यात आले आहे. यात २२ जणांचा समावेश आहे. पथकाच्या माध्यमातून रुग्णांना आकारण्यात आलेल्या भरमसाठ बिलांचे ऑडिट करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
तसेच तक्रारीत तथ्य निघाल्यास संबंधित रुग्णालयाचा नर्सिंग परवाना रद्द करुन थेट फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली.खासगी रुग्णालयाच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. गंभीर लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरऐवजी थेट अतिदक्षता विभागात दाखल करुन उपचार केले जात आहे. तसेच चुकीच्या पध्दतीने भरमसाठ बील आकारण्यात येत आहे. या तक्रारी प्राप्त झाल्यावर , याप्रकरणी काही रुग्णालये दोषी आढळले आहेत. त्यांच्यावर 100 टक्के कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.हॉस्पिटलमध्ये रुग्णाला कोविड केअर सेंटर अथवा कोणत्या कक्षात दाखल करायचे हे जिल्हा शल्यचिकित्सक, महापालिकेसाठी एमएचओ आणि ग्रामीण भागासाठी हा निर्णय घेण्याचा अधिकार हा डीएचओंना असेल. उपचारासाठी कसे बिल आकाराचे या माहितीचा फलक खासगी रुग्णालयांनी दर्शनी भागावर लावणे बंधनकार असेल. लूटमार केल्यास थेट फौजदारी कारवाई केली जाईल, अशी इशारा जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली.f
Home Breaking News **लूट करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये होणार ऑडिट- जिल्हाधिकारी नाशिक**(राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा...