Home बुलढाणा श्री संत ज्ञानेश्वर मागासवर्गीय पेठ येथील मुलांचे वसतीगृहात राहण-या अल्पवयीन पिडीत बालकावर...

श्री संत ज्ञानेश्वर मागासवर्गीय पेठ येथील मुलांचे वसतीगृहात राहण-या अल्पवयीन पिडीत बालकावर अनैसर्गिक अत्याचार, अमडापुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.

130

आशाताई बच्छाव

1001130737.jpg

श्री संत ज्ञानेश्वर मागासवर्गीय पेठ येथील मुलांचे वसतीगृहात राहण-या अल्पवयीन पिडीत बालकावर अनैसर्गिक अत्याचार, अमडापुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा:- चिखली तालुक्यातील श्री संत ज्ञानेश्वर मागासवर्गीय मुलाच्या वस्तीग्रह चे अध्यक्षक यांनी वस्तीगृहातीलच मुलावर अनैसर्गिक अशील कृत्य केल्यामुळे अमडापुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल सविस्तर वृत्त अशे की चिखली तालुक्यातील ग्राम पेठ येथील श्री संत ज्ञानेश्वर मागासवर्गीय मुलांचे वसतीगृहामध्ये इंयत्ता ०७ वीत शिकत असलेल्या १२ वर्षे, ०८ महिणे वयाचे
अल्पवयीन बालकाने त्याच्या आईला ५ जानेवारी रोजी दुपारचे वेळी वसतीगृहाचे अधिक्षक यांचे फोन वरून माहिती दिली की, वसतीगृह अधीक्षक विनायक भगवान देशमुख ३ जानेवारी रोजी रात्रीचे साडेनऊ वाजेच्यावा सुमारांस भाऊने मला होस्टेलचे बाथरूममध्ये नेवुन माझ्या सोबत अनैसर्गिक अश्लिल कृत्य केले आहे, मी घरी निघुन येतो असे मुलांनी त्याच्या आईला सांगितले आईने त्याला तु एकटाच घरी येवु नको, मी तेथे तुला घ्यायला येते असे सांगीतले पेठ येथे त्याच दिवशी सायंकाळी सदर मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, पेठ येथे जावुन मुलाला सोबत घेवुन आली.

त्यावेळी रात्री ऊशीर झाल्याने पिडीत व त्याची आई असे मेहकर येधील नातेवाईकाकडे रात्रभर मुक्कामी राहीले. रात्री दरम्यान बालकाचे आईने बालकाला बारकाईने विचारपुस सुरू केली असता, त्यावेळी बालकाने सांगीतले की, मागासवर्गीय वसतीगृहाचे अधिक्षक ज्यांना आम्ही भाऊ म्हणतो तो माझ्या सोबत मागील अंदाजे दोन महिन्यापासुन अनैसर्गिक, अश्लिल कृत्य करत होता. त्याने यापुर्वी पांच ते सहा वेळा असे कृत्य केले आहे. ३ जानेवारी
रोजी सुध्दा त्याने माझ्या सोबत असे अश्लिल व अनैसर्गिक कृत्य केले आहे. त्यामुळे मी ५ जानेवारी रोजी दुपारी फोन करून आईला माहिती दिली होती. मी फोन करून माहिती सांगीतल्याचे त्याला समजल्यावर आरोपी अधिक्षक याने मला काठीने मारहाण केली असल्याचे बालकाने त्याचे आईला सांगीतले. मुला सोबत घडलेल्या घटनेचा रिपोर्ट देण्यासाठी बालकाची आईने पोलीस स्टेशनला येवुन रिपोर्ट दिला असुन, पोलीस स्टेशन अमडापुर येथे आरोपी विरूध्द अप. क्र.- ००६/२०२५ कलम ६८, ११८ (१) BNS सहकलम ६, ८, १०बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल केला.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. पोलीस अधिक्षक श्री विश्व पासनसे साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री महामुनी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली लागलीच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील साहेब, पोस्टेक अमडापुरचे ठाणेदार सपोनी श्री निखिल निर्मळ अशांनी पोस्टॉपसह घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती हाताळली असुन, वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सपोनी श्री निखिल निर्मळ, पोहेकों भगवान शेवाळे पोस्टे अमडापुर असे आरोपीला ताब्यात घेवुन गुन्हयाचा तपास करीत आहेत.