🛑 सुशांतसिंहच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही; वहिनीनेही सोडले प्राण 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई, 16 जून : ⭕ अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येने बॉलिवूडवर शोककळा पसरली असून सुशांतचे कुटुंबीयही हा धक्का सहन करू शकलेले नाहीत. बिहार येथे राहणाऱ्या त्याच्या चुलत वहिनीलाही सुशांतच्या मृत्यूचा प्रचंड मानसिक धक्का बसला असून या धक्क्याने तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राजपूत कुटुंबावर कोसळलेल्या या दुहेरी संकटामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
असं त्याच्या चुलत वहिनीचं नाव आहे. सुधा देवी या बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील मलडिहा येथे राहतात. रविवारी सुशांतसिंह राजपूतने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मलडिहामध्येही अवघ्या काही तासांतच ही बातमी आली. सुशांतने जीवन संपवल्याचं ऐकून त्याची वहिनी सुधा देवीहिलाही जबरदस्त धक्का बसला. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली. तिने खाणं-पिणंही सोडून दिलं. काल सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असतानाच सुधा देवीचंही निधन झाल्याची बातमी धडकल्याने राजपूत कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असतानाच बिहारमध्ये सुधादेवीने प्राण सोडल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
दरम्यान, सुशांतसिंहच्या अंत्यसंस्कारावेळी श्रद्धा कपूर, अरुण शौरी आणि विवेक ओबेरॉयसह अनेक बडे कलाकार उपस्थित होते. विलेपार्लेतील पवनहंस स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशांतच्या अंत्यसंस्कारांवेळी जोरदार पाऊसही सुरू झाला होता. पावसामुळे स्मशानभूमीच्या बाहेर वाहतूक कोंडी झाली होती. सुशांतच्या आत्महत्येमागचं गुढ उकलण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली असून त्याच्या बहिणीसह अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच सुशांतचे फोन रेकॉर्ड्सही तपासले जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सुशांतच्या मॅनेजरला त्याच्या फोनचा पासवर्ड माहीत होता. याच्या मदतीने पोलिसांनी त्याने शेवटचा फोन कोणाला केला याचा शोध घेतला. यात त्याचा मित्र महेश कृष्णा शेट्टीला सुशांतने रात्री ३ वाजता फोन केला असल्याचं उघड झालं. पण बरीच रात्र झाल्याने महेश फोन उचलू शकला नव्हता. यानंतर त्याने सकाळी बहिणीला फोन केला होता. बहिणीशी त्याने थोडावेळ संवाद साधला. पण त्याच्या बोलण्यातून तो असं काही टोकाचं पाऊल उचलेल असं तिला जाणवलं नसल्याचं पोलीस तपासातून निष्पन्न झालं आहे. सुशांतचे रात्री आलेले कॉल्स पाहून महेशने दुपारी १२ वाजता सुशांतला फोन केला होता. पण तोवर त्याने आत्महत्या केली होती, असंही पोलीस सूत्रांनी सांगितलं.⭕